पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 05:50 IST2025-04-01T05:49:40+5:302025-04-01T05:50:26+5:30

Nidhi Tiwari News: भारतीय विदेश सेवेतील (आयएफएस) अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाच्या एका आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.

Nidhi Tiwari appointed as Private Secretary to the Prime Minister | पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती  

पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती  

नवी दिल्ली -भारतीय विदेश सेवेतील (आयएफएस) अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाच्या एका आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. वर्ष २०१४च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी तिवारी सध्या पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उप सचिवपदावर कार्यरत आहेत.  नवा आदेश २९ मार्च रोजी जारी करण्यात आला असून, यात म्हटले आहे की, कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने तिवारी यांची पीएमओमधील कार्याचा अनुभवाच्या आधारावर खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. २०१४ मध्ये, तिवारी यांनी परराष्ट्र सेवा प्रशिक्षणादरम्यान ईएएम (विदेश मंत्री) सुवर्ण पदक सर्वोत्कृष्ट अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून जिंकले होते. 

Web Title: Nidhi Tiwari appointed as Private Secretary to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.