शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

NIA Raid on PFI: रेडपूर्वी तयार करण्यात आली होती PFI ची 'क्राइम कुंडली', संपूर्ण रात्र कंट्रोल रूममध्येच होते अजित डोवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 13:09 IST

पीएफआयवर सर्जिकल स्ट्राइक करण्यापूर्वी गुप्तचर संस्थांच्या वेगवेगळ्या चमूने पीएफआयच्या अशा प्रत्येक सदस्यासंदर्भात माहिती गोळा केली होती, ज्याच्यापासून देशाच्या सुरक्षिततेला धोका होता.

पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) नुकत्याच टाकण्यात आलेल्या रेडपूर्वी आयबी आणि रॉने पीएफआयच्या कारवायांसंदर्भातील महत्वाची माहिती एकत्र केली होती. यात पीएफआयचे कॅडर आणि त्यांच्या नेत्यांशीसंबंधित माहितीचा एक संच (Dossier) तयार करण्यात आला होता. रेड टाकण्यापूर्वी हा Dossier नॅशनल इंव्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि प्रवर्तन निदेशालयाला (ED) पुरवण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे, मध्यरात्री झालेल्या या ऑपरेशनपूर्वी दिल्लीमध्ये एक स्पेशल कंट्रोल रूम तयार करण्यात आली होती. या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल आणि आयबीचे प्रमुख तपन डेका हे रात्रभर याच कंट्रोल रूममध्ये होते, असे समजते.

मिटिंगमध्ये करण्यात आला होता संपूर्ण प्लॅन - यासंदर्भात झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एनआयए, ईडी आणि काही राज्यांतील पोलिसांच्या मदतीने पीएफआयच्या 93 लोकेशन्सवर छापे टाकण्यात आले होते. यात पीएफआयच्या एकूण 106 जणांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात गृह मंत्री अमित शाह यांनी पीएफआयवर कारवाई करन्यासाठी एनएसए अजीत डोभाल, आयबी प्रमुख तपन डेका आणि रॉचे प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत एक महत्वाची बैठक केली होती. यात पीएफआयच्या देश विरोधी कारवाया जमवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता.

रात्रीतूनच छापेमारी -पीएफआयवर सर्जिकल स्ट्राइक करण्यापूर्वी गुप्तचर संस्थांच्या वेगवेगळ्या चमूने पीएफआयच्या अशा प्रत्येक सदस्यासंदर्भात माहिती गोळा केली होती, ज्याच्यापासून देशाच्या सुरक्षिततेला धोका होता. पीएफआयविरोधात काही रेड, अशा लोकेशन्सवर झाल्या, जेथे एनआयए आणि ईडीच्या टीमलाही धोका होता. यामुळे, छापे अशा पद्धतीने प्लॅन करण्यात आले होते, की सकाळी या छाप्यांसंदर्भात लोकांना माहिती होईपर्यंत सर्व टीम आपापल्या सुरक्षित ठिकाणी परत आलेल्या असतील. महत्वाचे म्हणजे झालेही असेच. सकाळी आठ वाजेपर्यंत अधिकांश टीम आरोपींना घेऊन हेडक्वार्टरवर परतले होते. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाAjit Dovalअजित डोवालPoliceपोलिस