पंजाबमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे टाकल्याचा तपास एनआयएकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 04:10 IST2019-10-05T04:09:57+5:302019-10-05T04:10:21+5:30
पंजाबमध्ये पाकिस्तानने ड्रोनद्वारे मोठा शस्त्रसाठा, स्फोटके टाकल्याच्या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे.

पंजाबमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे टाकल्याचा तपास एनआयएकडे
नवी दिल्ली : पंजाबमध्येपाकिस्तानने ड्रोनद्वारे मोठा शस्त्रसाठा, स्फोटके टाकल्याच्या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे.
पाकिस्तान आणि जर्मनी समर्थित खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा कट उद्ध्वस्त केल्यानंतर पंजाब सरकारने विनंती केल्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतला. अतिरेकी गट पंजाब आणि शेजारील राज्यांत घातपात घडवण्याचा कट रचत आहेत, असे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे. पंजाबमध्ये दहशतवाद वाढवून तेढ, अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे. या सर्वांची एनआयएकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे गृह मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे. २२ सप्टेंबरला तरणतारण जिल्ह्यात पाच एके-४७ रायफल्स, पिस्तूल, सॅटेलाईट फोन व बॉम्बचा साठा आढळला होता.