शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत NIA ने CRPF जवानाला घेतले ताब्यात; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:06 IST

CRPF जवान 2023 पासून पाकिस्तानला माहिती देत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशभरातून अनेक हेर पकडले जात आहेत. अलिकडेच ज्योती मल्होत्रा ​​नावाच्या एका युट्यूबरलाही हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आता राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दिल्लीतून एका CRPF जवानाला अटक केली आहे. तो देशाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या जवानाला माहिती पाठवण्यासाठी पैसे मिळायचे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली एनआयएने दिल्लीतून सीआरपीएफ जवान मोती राम जाटला अटक केली आहे. तो 2023 पासून भारताची गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना पुरवायचा. एनआयएच्या पथकाने त्याला पटियाला हाऊस कोर्टाच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, कोर्टाने आरोपीला 6 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली जात आहे. 

पैशासाठी देशद्रोहएनआयएला तपासात असे आढळून आले की, आरोपी गेल्या 2 वर्षांपासून हेरगिरी करत होता. त्याला यासाठी पाकिस्तानकडून भरपूर पैसे मिळायचे. हे व्यवहार बहुतेक हवालाद्वारे केले जात होते. या संपूर्ण प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो, असे पथकाने म्हटले आहे. त्यामुळे चौकशीनंतर आणखी अनेक गुपिते उघड होतील. मोतीराम जाटच्या संपर्कात असलेल्या किंवा ज्यांच्याद्वारे ही माहिती लीक होत होती अशा व्यक्तींवरही एजन्सी लक्ष ठेवून आहे. 

सीआरपीएफने जवानाला नोकरीवरून काढूलेअटकेनंतर सीआरपीएफच्या नियमांनुसार जवानाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात अनेक हेर पकडले गेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय नाव ज्योती मल्होत्रा ​​आहे. युट्यूबर ज्योतीवर पाकिस्तानला गुप्तचर माहिती पाठवल्याचा आरोप आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला