मनेश शेळके यांच्या बातम्या 3
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
खिडकीतून पोत लंपास
मनेश शेळके यांच्या बातम्या 3
खिडकीतून पोत लंपास औरंगाबाद : सातारा परिसरातील साईनगरात घराच्या खिडकीतून हात घालून गजाच्या साह्याने बॅगमध्ये असलेली चार तोळ्यांची पोत चोरट्यांनी रविवारी रात्री अडीचच्या सुमारास लंपास केली. विजया रवींद्र चौधरी (६३) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. रविवारी रात्री त्या घरात झोपलेल्या होत्या. चोरट्यांनी देवघराची स्लायडिंग खिडकी उघडून रॅकमध्ये असलेली बॅग गजाच्या साह्याने खिडकीपर्यंत ओढून घेतली. त्यात असलेली पोेत लंपास केली. सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार दाभाडे अधिक तपास करीत आहेत. ........रिक्षांमुळे वाहतुकीला अडथळा औरंगाबाद : रिक्षा व ॲपेचालक हे प्रवासी मिळविण्यासाठी कोठेही रस्त्याच्या कडेलाच वाहन उभे करतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, वाहतुकीसही यामुळे ठिकठिकाणी अडथळा निर्माण होत आहे. शहरात तीन उड्डाणपुलांची कामे चालू आहेत. त्यामुळे जालना रोडची वाहतूक तर पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. त्यामध्येच प्रवासी वाहतूक करणार्या ॲपे व रिक्षा हे प्रवासी मिळविण्यासाठी पाठीमागील वाहनाचा विचार न करता प्रवासी दिसेल त्या ठिकाणी वाहन उभे करतात. या प्रकारामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशा चालकांवर दररोज वाहतूक पोलीस कारवाई करतात. तरीही परिणाम दिसत नाही. जळगाव रोडचीही हीच परिस्थिती आहे. ......जादा भावाने रॉकेल विक्रीऔरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी अनेक जण जास्तीचे रॉकेल भरून वाटेल त्या भावाने त्याची विक्री करतात. असे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेकांनी छुप्या पद्धतीने हा धंदाच सुरू केला आहे. ५० ते ६० रुपये लिटर या दराने सर्रासपणे ते रॉकेलची विक्री करतात. याकडे पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.