शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनमधून पडली नवविवाहिता; मृतदेह उचलून नेत असताना पतीला पोलिसांनी थांबवून करायला लावली सही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:21 IST

धावत्या रेल्वेतून खाली पडून एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशात घडली.

MP Accident: मध्य प्रदेशातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरीतील रतौर रोड रेल्वे ट्रॅकजवळ एक नवविवाहित महिला धावत्या ट्रेनमधून खाली पडली. घटनेची माहिती मिळताच पतीने साखळी ओढून ट्रेन थांबवली. काही अंतर पार केल्यानंतर पतीला त्याची पत्नी मृतावस्थेत आढळली. नंतर पतीने कसेबसे त्याच्या पत्नीला जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र यावेळी रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणाही समोर आला आहे.

वकील विकास जोशी हे ग्वाल्हेरचे रहिवासी आहेत. १६ एप्रिल रोजी विकासचे लग्न उत्तर प्रदेशातील ओरई येथील रहिवासी शिवानी शर्माशी झाले. शिवानी देखील एलएलबीचे शिक्षण घेत होती. विकासच्या म्हणण्यानुसार, तो शिवानीला परीक्षा देण्यासाठी ओरईला घेऊन गेला होता. परीक्षेनंतर, दोघेही मंगळवारी ग्वाल्हेरला परतले आणि बुधवारी संध्याकाळी उज्जैनी एक्सप्रेसने इंदूरसाठी रवाना झाले होते. त्या दरम्यानच ही घटना घडली.

२७ मे रोजी रात्री दोघेही ट्रेनने इंदूरला जात असताना, ट्रेन रात्री ९ वाजता शिवपुरी रेल्वे स्टेशनवर पोहोचली. जेव्हा ट्रेन शिवपुरीपासून थोडी पुढे गेली तेव्हा शिवानीला उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे ती कोचच्या दाराजवळ येऊन बसली आणि उलट्या करु लागली. त्यावेळी विकास पाणी आणण्यासाठी आत गेला. पाणी घेऊन परत आल्यावर विकास तिथे आला तेव्हा त्याला शिवानी तिथे दिसली नाही. तेव्हा जवळच उभ्या असलेल्या एका तरुणाने त्याला सांगितले की एका महिलेचा पाय घसरला आणि ती खाली पडली. हे ऐकून विकासने ट्रेनची चेन लगेच खाली खेचली आणि उडी मारली.

शिवानी जिथे पडली होती तिथून ट्रेन एक किलोमीटर पुढे निघून गेली होती. विकासने अंधारात त्याच्या पत्नीचा शोध सुरू केला. शेवटी, त्याला शिवानी सापडली आणि तो तिला कसेतरी रतौर क्रॉसिंगजवळील रस्त्यावर घेऊन आला. आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नव्हते. त्यानंतर थोड्यावेळाने रेल्वे पोलीस तिथे आले. त्यांनी विकासला तू पळून जातोय, कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर तुला जाऊ दिलं जाईल, असं म्हटलं आणि त्याला कारवाई झाल्यानंतर सोडलं. त्यादरम्यान वाटेतच त्यांना हायवेवर पोलीस भेटले. १५ मिनिटांत त्यांनी एका कारमध्ये बसवून दोघांना रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले.

"घटनेची माहिती दिल्यानंतरही रेल्वे पोलिसांनी मदत केली नाही. सुरुवातीला मी स्वतः अंधारात टॉर्चच्या मदतीने पत्नीचा शोध घेतला. ती सापडल्यानंतर मी स्वतः तिला उचलून घेऊन अर्धे अंतर चालत गेले. नंतर, जीआरपीचे लोक आले आणि नियम आणि कायदे याबद्दल बोलू लागले आणि कागदपत्रांवर सही करण्यास सांगितले. त्यावेळी माझ्या पत्नीला उपचारांची गरज होती," असं विकास म्हणाला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघातPoliceपोलिस