हैदराबाद - चित्रपटसृष्टीत जम बसविण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबई व देशाच्या इतर भागांतील नट्यांना मोठया पैशाच्या आमिशाने वेश्या व्यवसायाला लावण्याचे एक रॅकेट हैदराबाद पोलिसांनी उघड केले असून येथील श्रीमंती वस्तीमधील एका हॉटेलवर धाड टाकून मुंबईतील एका नटीची सुटका केली आहे.शनिवारी रात्री केलेल्या या कारवाईसंबंधी पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सुटका केलेल्या या नवोदित नटीचे नाव साहजिकच दिलेले नाही. ती २४ वर्षांची आहे , मुंबईत राहते व ती मुळची आग्रा येथील आहे, एवढच त्यात उल्लेख आहे. मिळालेल्या गुप्तवार्तेच्या आधारे पाळत ठेवून घातलेल्या या धाडीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाची व्यवस्था करून देणारा जनार्दन राव आणि त्याच्याकडे गिºहाईक म्हणून आलेल्या एका सरकारी अधिकाºयास अटक केली.
वेश्या व्यवसायातून नवोदित नटीची झाली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:28 IST