शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांमध्ये नववर्षाच्या उत्सवावर बंदी, आंध्र प्रदेशचा निर्णय, हिंदू-तेलुगु परंपरेत प्रथा नसल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:08 IST

आंध्र प्रदेशातील धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन पाहणा-या देणगी, दाननिधी विभागाने नव्या वर्षाच्या उत्सवावर सरसकट बंदी घातली आहे. आंध्र प्रदेश सरकारने तशा आदेशाचे परिपत्रक जारी केले आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन पाहणा-या देणगी, दाननिधी विभागाने नव्या वर्षाच्या उत्सवावर सरसकट बंदी घातली आहे. आंध्र प्रदेश सरकारने तशा आदेशाचे परिपत्रक जारी केले आहे. नव्या वर्षानिमित्त होणाºया उत्सवाचे आयोजन हिंदू आणि तेलुगु परंपरेप्रमाणे नसल्याचे सरकारने या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.त्यामुळे राज्यातील कोणत्याही मंदिरांमध्ये नववर्षाच्या निमित्ताने विद्युत रोशणाई करू नये आणि फुलांवरही अव्वाच्या सव्वा खर्च करू नये, असे सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनांना सांगितले आहे. सुट्या तसेच नववर्षाच्या दिवशी नेहमीच सर्वत्र मंदिरात देवदर्शनासाठी जाणाºया भाविकांची संख्याही प्रचंड असते. मात्र त्यानिमित्ताने मंदिरांत उत्सवी वातावरण निर्माण करू नये, असे आंध्र प्रदेश सरकारने सर्व देवस्थानांना कळवले आहे.या सरकारी आदेशात म्हटले आहे की, तेलुगु नवीन वर्ष चैत्र मासात ‘उगडी’ नावाने ओळखले जाते. तो उत्सव स्वरूपात साजरा करण्यास हरकत नाही. मात्र मंदिर व्यवस्थापन आणि पुजाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत की, नववर्षाच्या निमित्ताने फुलांची सजावट, बॅनर आणि विशेष व्यवस्था करण्यासाठी पैसे खर्च करू नयेत. (वृत्तसंस्था)आपलेच कॅलेंडर पाळातिरुमला तिरुपती देवस्थानशिवाय राज्यातील इतर मंदिरांच्या प्रशासकीय बाबींवर हिंदू धर्म परीरक्षण ट्रस्टचे नियंत्रण आहे. या ट्रस्टचे सचिव सी. व्ही. राघवचारीयालु यांनी सांगितले की, यापूर्वी नवीन वर्षानिमित्त होणाºया कार्यक्रमात फुलांची सजावट आणि बॅनरवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. हिंदू आणि तेलुगु परंपरेनुसार १ जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करणे उचित नाही. असे प्रकार आता थांबायला हवेत. आम्ही हिंदू कॅलेंडरऐवजी सर्रास इंग्रजी कॅलेंडरनुसार अनुसरण करत आहोत. हे चुकीचे आहे.

टॅग्स :Templeमंदिर