मोदींकडून चीन, कोरिया, व्हिएतनामला त्यांच्याच भाषेत नववर्षाच्या शुभेच्छा
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:22+5:302015-02-20T01:10:22+5:30
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी चीन, कोरिया, व्हिएतनाम आणि मंगोलिया या देशांना त्यांच्या भाषेत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या़

मोदींकडून चीन, कोरिया, व्हिएतनामला त्यांच्याच भाषेत नववर्षाच्या शुभेच्छा
न ी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी चीन, कोरिया, व्हिएतनाम आणि मंगोलिया या देशांना त्यांच्या भाषेत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या़चीनी नववर्षानिमित्त माझ्या शुभेच्छा़ येणारे वर्ष आपल्याला सुख, शांती, समृद्धी देवो, अशा शब्दांत मोदींनी टिष्ट्वटरवरून चीनी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे़ कोरियाला शुभेच्छा देताना, जगातील माझ्या कोरियायी मित्रांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, असे मोदींनी लिहिले आहे़ व्हिएतनामला आणि मंगोलियाच्या आपल्या बांधवांनाही मोदींनी अशाच शुभेच्छा दिल्या आहेत़