शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई; बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्यानं 'शहबाज' सरकार बिथरलं
3
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
4
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
5
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
6
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
7
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
8
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
9
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
10
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
11
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
12
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
13
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
15
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
16
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
17
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
19
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
20
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

New Waqf Act: देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची  मंजुरी; AIMPLB चा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:44 IST

या कायद्यामुळे मुस्लीम महिलांना लाभ होईल आणि वक्फ मालमत्तेच्या प्रबंधनासंदर्भात पारदर्शिता येईल, असे सरकारने म्हटले आहे...

वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यानंतर आता वक्फ संशोधन विधेयक-2025 चे कायद्यात रुपांतर झाले आहे. मात्र, या नव्या कायद्याला काँग्रेस, एआयएमआयएम आणि आम आदमी पक्षाने (AAP) वेगवेगळ्या याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याशिवाय, देशाच्या विविध भागात मुस्लीम संघटना या विरोधात निदर्शनेही करत आहेत. तसेच ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) शनिवारी या विधेयकाविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

संसदेच्या कोणत्या सभागृहात किती मतं मिळाली -महत्वाचे म्हणजे, हा कायदा मुस्लीम विरोधी नाही, तर याचा उद्देश पक्षपात आणि वक्फ मालमत्तांचा दुरुपयोग रोखणे असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) या कायद्यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी वेळही मागितला होता. लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली होती. तसेच, राज्यसभेत या बीलाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते पडली. महत्वाचे म्हणजे, राज्यसभेत विरोधी पक्षांकडून आणले गेलेले सर्व सुधारणा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आले.

AIMPLB चा आंदोलनाचा इशारा - दरम्यान, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) शनिवारी या विधेयकाविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. एआयएमपीएलबीच्या वतीने दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, विजयवाडा, मलप्पुरम, पटना, रांची, मलेरकोटला आणि लखनौ येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करेल. 

या कायद्यासंदर्भात बोलताना, "सत्ताधारी पक्षाने बहुमताचा दुरुपयोग करत हे विधेयक जबरदस्तीने लादले असल्याचे काँग्रेसचे राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे. याउलट, या कायद्यामुळे मुस्लीम महिलांना लाभ होईल आणि वक्फ मालमत्तेच्या प्रबंधनासंदर्भात पारदर्शिता येईल, असे सरकारने म्हटले आहे. 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूwaqf board amendment billवक्फ बोर्डBJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआपAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन