शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण, परीक्षा टाळण्यासाठी 11 वीच्या विद्यार्थ्याने केली प्रद्युम्नची हत्या- सीबीआय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 12:55 IST

रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.

ठळक मुद्देरायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या मुलाला आजच  ज्युवेनाइल कोर्टात हजर केलं जाणार आहे.

गुरूग्राम- रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याच शाळेत अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या मुलाला आजच  ज्युवेनाईल कोर्टात हजर केलं जाणार आहे. याप्रकरणी अजून जास्त माहिती देण्यात आलेली नसून सीबीआय आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी याआधी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आली आहे. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा आणि पालक सभा रद्द व्हावी यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याचं सीबीआयच्या तपासातून उघड झालं आहे. प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता, असंही सीबीआयने स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे तो शाळेतील अकरावीच्या वर्गात शिकणार आहे. प्रद्युम्नची हत्या झाली त्यावेळी हा विद्यार्थी शाळेच्या बाथरूमध्ये उपस्थित होता, असा संशय तपास पथकाला आहे. त्यामुळे पुढील तपास करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, माझा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. “माझ्या मुलानेच प्रद्युम्नच्या हत्येची माहिती सर्वात आधी शिक्षक आणि शाळेच्या माळ्याला माहिती दिली होती,” असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं. 'सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माझी आणि मुलाची चौकशी केली. त्यानंतर मुलाला ताब्यात घेतलं. सीबीआयने आधी पण त्याची चार-पाच वेळा चौकशी केली होती. शिवाय मुलाच्या स्कूलबॅगसह इतर सामानही जप्त केलं होतं. शिवाय गुरुग्राम पोलिसांनीही तपासादरम्यान सीआरपीसीचं कलम 164 अंतर्गत त्याचा जबाब नोंदवला आहे, असंही ते म्हणाले. याविरोधात मी गुरुग्राम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे, असंही विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.  याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलStudentविद्यार्थीMurderखूनCrimeगुन्हा