गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी नवीन रेल्वेची सुविधा

By Admin | Updated: December 21, 2014 23:49 IST2014-12-21T23:49:31+5:302014-12-21T23:49:31+5:30

केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू

New trains are available for tourists coming to Goa | गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी नवीन रेल्वेची सुविधा

गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी नवीन रेल्वेची सुविधा

ंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू
बार्देस : गोवा आणि पर्यटन वेगळे नाही. गोव्यात येणार्‍या पर्यटकांमुळे रोजगाराची निर्मिती होते. येणार्‍या पर्यटकांसाठी साधन सुविधा हव्यात. केंद्र सरकार या सर्व बाबींकडे लक्ष देत असून, पर्यटकांसाठी नवीन रेल्वे सुरू केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले.
थिवी येथील रेल्वे प्रकल्पाच्या शनिवारी झालेल्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रभू म्हणाले की, आज रेल्वे प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. फक्त पाच महिन्यांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. थिवी रेल्वे स्थानकातील प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यामुळे रेल्वेच्या रूपाने गोव्यासाठी सध्या चांगले दिवस आले आहेत, असे म्हणायला हकरत नाही. पर्यटनमंत्री परूळेकर यांनी आपल्याकडे पर्यटकांसाठी रेल्वे गाडीची विनंती केली होती. त्यांची पर्यटकांबाबतची तळमळ पाहून ३१ डिसेंबरपर्यंत नवीन रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्यासाठी बरेच काही दिले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रात नेवून गोव्याबाबतची त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गोवा आणि महाराष्ट्र जवळचा असल्यामुळे गोव्यातून कायमस्वरूपी रेल्वे सुरू केली जाईल.
देशभरात अनेक मंदिरे, चर्च, मश्जिद आहेत, त्या काही ठिकाणी रेल्वे पोहोचत नाहीत. त्या-त्या ठिकाणी रेल्वे पोहोचवण्याचा आमच्या प्रयत्न असून, कोकण रेल्वेमधून कोकण दिसावा अशी सरकारची इच्छा आहे, असे प्रभू यांनी नमूद केले.
परूळेकर म्हणाले की, आपण केलेली विनंती रेल्वेमंत्र्यांनी मान्य केली आहे. रेल्वेच्या बाबतीत काही सुधारणा करायच्या असतील त्याही करण्याचा दृढ नि›य प्रभू यांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे येथील जनतेसाठी रोजगार वाढेलच आणि यंदा अधिक पर्यटक गोव्यात येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी प्रभू यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. (प्रतिनिधी)

फोटो : थिवी रेल्वे स्थानकाजवळ नवीन रेल्वेच्या जागेचे भूमीपूजन करताना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू. सोबत गोवाचे पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर व इतर. (प्रकाश धुमाळ)
२०१२-एमएपी-११

Web Title: New trains are available for tourists coming to Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.