शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शंभरच्या नव्या नोटेमुळे तब्बल 100 कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 5:12 PM

भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार असल्याचे  भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. या नव्या 100 रुपयांच्या नोटेचा फोटोही जारी करण्यात आले आहे.

नवी दिल्ली -  भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार असल्याचे  भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. या नव्या 100 रुपयांच्या नोटेचा फोटोही जारी करण्यात आले आहे. परंतु ही नवी नोट जु्न्या नोटेपेक्षा आकाराने वेगळी आहे. यामुळे एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत. यासाठी १०० कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच आरबीआयने २०० रुपयाची नोट चलनात आणली होती. त्याचा आकारही नेहमींच्या नोटेपेक्षा वेगळा असल्याने त्यावेळीही एटीएमचे रिकॅलिब्रेट करण्यात आले होते. त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. तरीही आरबीआयने १०० रुपयाची नवी नोट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. दरम्यान एकदाच रिकॅलिब्रेशन न करता नेहमीनेहमी शिल्लकचा भूर्दंड कशाला असा प्रश्न सोशल मीडियातून विचारण्यात येत आहे.  

विशेष म्हणजे, या 100 रुपयांच्या नोटांसाठी वापरण्यात आलेला कागद आणि शाई ही स्वदेशी आहे.  साधारणत: ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या नोटा चलनात येतील, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.

कशी आहे नोट - 

100 रुपयांच्या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. या नोटेमध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचा (बावडी) फोटो देण्यात आला आहे. देवास येथील मुद्रण छपाई केंद्रात 100 रुपयांच्या नोटांची छपाई सुरु झाली आहे. म्हैसूर येथील ज्या प्रिटींग प्रेसमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले होते. त्याच, प्रिंटिंग प्रेसमध्ये या 100 रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले आहे. तसेच, 100 रुपयांच्या या नव्या नोटेमध्ये मायक्रो सेक्युरिटी फिचर्स असणार आहेत. या नोटेचा आकार जुन्या 100 रुपयांच्या नोटेपेक्षा कमी असून साइज 66 मिमी × 142 मिमी असणार आहे.

टॅग्स :atmएटीएमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक