शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रशांत किशोर यांच्यासाठी नवीन पद? काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सल्लागार करण्याचा दुसरा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 09:05 IST

काँग्रेसच्या सूत्रांनुसार येत्या पंधरा दिवसांत कधीही  प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर  प्रशांत किशोर यांनी स्वत:ला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी एक वर्षाचा अवधी देण्याची घोषणा केली होती.

शरद गुप्ता -नवी दिल्ली :   निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासाठी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सरचिटणीसांचे (रणनीती) नवे पद निर्माण  केले जाऊ शकते किंवा त्यांना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

काँग्रेसच्या सूत्रांनुसार येत्या पंधरा दिवसांत कधीही  प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर  प्रशांत किशोर यांनी स्वत:ला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी एक वर्षाचा अवधी देण्याची घोषणा केली होती. त्यांच्यासंदर्भातील घोषणा त्या आधीही होऊ शकते. काँग्रेस पक्ष १३ मेपासून  उदयपूरमध्ये होणाऱ्या  चिंतन शिबिरापर्यंत वाट पाहणार नाही.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांसमक्ष सादरीकरण केले होते. तेव्हाच त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला होता. त्याआधी ते फक्त गांधी परिवारातील सदस्यांचीच भेट घेऊन सल्लामसलत करायचे. त्यांना कोणते पद द्यायचे, याचा निर्णय करायचा असल्याने त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या औपचारिक घोषणेला उशीर होत आहे.  त्यांना आपली रणनीती अमलात आणण्यात कोणत्या प्रकारचा अडसर येऊ नये, असे एखादे पद त्यांना द्यावे, अशी गांधी परिवाराची इच्छा आहे.

महत्त्व होईल अधोरेखित...काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सल्लागार म्हणून त्यांची भूमिका जितेंद्र प्रसाद किंवा अहमद पटेल यांच्यासारखीच असेल. त्यासाठीच रणनीती सरचिटणीस हे नवीन पद प्रशांत किशोर यांच्यासाठी निर्माण केले जाईल. यातून त्यांचे पक्षातील महत्त्व अधोरेखित होईल.  भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी  यशस्वी ठरेल, अशी  विरोधी पक्षांची आघाडी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थापन करण्याचा प्रशांत किशोर यांचा प्रयत्न असेल. यात काँग्रेसची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी