शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

New Parliament Inauguration : 'अहंकाराच्या विटांनी ...' नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन राहुल गांधीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 16:28 IST

Parliament Building Event: नवीन संसद भवनाचे उद्घाटन PM मोदींच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

New Parliament Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. मात्र या उद्घाटन सोहळ्यावरुन राजकारण सुरू झालं आहे. देशातील 19 विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह 19 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षांनी केंद्र सरकारवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. 

काय म्हणाले राहुल? यातच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले की, 'राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन न करणे आणि त्यांना या समारंभासाठी निमंत्रित न करणे, हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे. संसद ही अहंकाराच्या विटांनी बनलेली नसून घटनात्मक मूल्यांनी बनलेली आहे', असे राहुल यांनी म्हटले आहे.

28 मे या तारखेवरही प्रश्न काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही उद्घाटनाच्या तारखेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 28 मे ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. यंदा त्यांची 140 वी जयंती आहे. आता वीर सावरकरांच्या जयंतीच्या दिनीच संसद भवनाचं उद्घाटन होत आहे. यावरूनही विरोधकांनी टीका केली आहे.

या पक्षांकडून बॉयकॉट

संसदेच्या उद्घाटन समारंभावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १९ पक्षांनी बहिष्काराची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, एनसीपी, सीपीआय(एम), आरजेडी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम या पक्षांचा समावेश आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस