शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

New Parliament Building: अखेर ठरलं: 28 मे रोजी दुपारी 12 वाजता PM मोदी करणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 15:12 IST

New Parliament Building: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासंदर्भात निमंत्रण पत्रिकाही समोर आली आहे.

New Parliament Building: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख आणि वेळ अखेर ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे, रविवारी दुपारी 12 वाजता नव्याने बांधलेल्या संसद भवनाचे उद्घाटन करतील. यासाठी सकाळपासूनच विधीवत पुजेला सुरुवात होईल. नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी सुमारे 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नवीन इमारतीत अनेक प्रकारच्या हायटेक सुविधाही देण्यात आल्या आहेत. याच्या हॉलमध्ये 1224 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासंदर्भात निमंत्रण पत्रिकाही समोर आली आहे. 28 मे रोजी दुपारी 12 वाजता नवीन इमारतीचे उद्घाटन पीएम मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे कार्डमध्ये सांगण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेवर नवीन संसद भवनाचे चित्र छापलेले आहे. कार्डवर सर्व पाहुण्यांना सकाळी 11.30 पर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास सांगितले आहे.

2020 मध्ये मोदींनी पायाभरणी केली 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभा आणि राज्यसभेने केंद्र सरकारला नवीन इमारती बांधण्याची विनंती केली होती. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पीएम मोदींनी नवीन इमारतीची पायाभरणी केली. नवीन इमारतीच्या बांधकामाची निविदा टाटा प्रकल्पाला देण्यात आली आहे. सुरुवातीला याची किंमत 861 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र नंतर ती वाढून 1200 कोटी रुपये झाली.

विरोधकांची उद्घाटनावरुन टीकासंसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाची चर्चा सुरू होताच काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे, पंतप्रधानांच्या हस्ते नाही, असे म्हटले.

भाजपचा काँग्रेसवर पलटवारनवीन संसद भवनाबाबत काँग्रेसकडून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सोमवारी काँग्रेसवर नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. स्वतःच्या स्वार्थासाठी भारताचा अवमान करण्याचे 'स्वस्त राजकारण' करण्याची काँग्रेसला सवय झाली आहे, असे भाजपने म्हटले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदdelhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेस