New Parliament Building Inauguration LIVE: "नवीन संसद भवन भारतासोबतच जगाच्या प्रगतीलाही हातभार लावेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 08:34 AM2023-05-28T08:34:57+5:302023-05-28T13:40:02+5:30

New Parliament Building Inauguration LIVE: संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व ७७५ खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

New Parliament Building Inauguration LIVE: PM Modi Inaugurates New Sansad Bhavan After Grand Pooja | New Parliament Building Inauguration LIVE: "नवीन संसद भवन भारतासोबतच जगाच्या प्रगतीलाही हातभार लावेल"

New Parliament Building Inauguration LIVE: "नवीन संसद भवन भारतासोबतच जगाच्या प्रगतीलाही हातभार लावेल"

googlenewsNext

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व ७७५ खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले. नव्या संसद भवनाच्या रविवारी होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अधिनामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शनिवारी सेंगोल (राजदंड) सुपूर्द केला होता. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. जवळपास 971 कोटी रुपये खर्चून बांधलेले, नवीन संसद भवन भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे.

New Parliament Building Inauguration LIVE 

- ही इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि अत्याधुनिक गॅजेट्सने सुसज्ज आहे. यामुळे 60,000 हून अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी आम्ही डिजिटल गॅलरी तयार केली आहे - पंतप्रधान मोदी

- जेव्हा आपण नवीन संसदेत आधुनिक सुविधांबद्दल बोलतो तेव्हा मला समाधान वाटते की आम्ही देशातील गावे जोडण्यासाठी 4 लाख किलोमीटरहून अधिक रस्ते बांधले आहेत - पंतप्रधान मोदी

- पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत, आपल्या देशाचा आणि तेथील लोकांचा विकास ही आपली प्रेरणा आहे. आज या नवीन संसदेच्या उभारणीचा आपल्याला जसा अभिमान वाटतो, तसेच गेल्या 9 वर्षांत देशात 4 कोटी गरीब लोकांसाठी घरे आणि 11 कोटी शौचालये बांधल्याचा विचार करताना मला खूप समाधान मिळते - पंतप्रधान मोदी

- नवीन संसदेची गरज होती. आगामी काळात जागा आणि खासदारांची संख्या वाढेल हेही पाहावे लागेल. म्हणूनच नवीन संसद बनवणे ही काळाची गरज होती - पंतप्रधान मोदी

भारत ही लोकशाहीची जननी आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हे आपले संस्कार, कल्पना आणि परंपरा आहे - पंतप्रधान मोदी

- भारतासोबतच नवीन संसद भवन जगाच्या प्रगतीलाही हातभार लावेल - पंतप्रधान मोदी

- जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जाते. ही नवी संसद भारताच्या विकासातून जगाला विकासाकडेही नेईल - पंतप्रधान मोदी

- आज संसदेत पवित्र 'सेंगोल' बसवण्यात आले. चोल राजवटीत 'सेंगोल' हे न्याय, नीतिमत्ता आणि सुशासनाचे प्रतीक होते - पंतप्रधान मोदी

- ही नवी संसद आत्मनिर्भर भारताच्या उदयाची साक्षीदार बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

- नवी संसद ही केवळ एक इमारत नाही, तर ती भारतातील 140 कोटी लोकांच्या आकांक्षेचे प्रतिक आहे. जगाला भारताच्या निर्धाराबद्दल संदेश देते - पंतप्रधान मोदी

- प्रत्येक देशाच्या विकासाच्या प्रवासात असे काही क्षण येतात जे अजरामर होतात. 28 मे हा असा दिवस आहे - पंतप्रधान मोदी 

- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात

- 75 रुपयांचे नाणे जारी 

- संपूर्ण देश आज या क्षणाचा साक्षीदार आहे. मी पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो ज्यांच्या नेतृत्वाखाली ही नवीन संसद 2.5 वर्षात बांधली गेली - लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत येताच 'मोदी-मोदी'च्या घोषणा

- नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

- संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत - राहुल गांधी

- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन 

- "मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही", नव्या संसद भवनावरून शरद पवारांचं टीकास्त्र

2014 पेक्षा 2019 ला मोदी साहेबांच्या नेतृत्वात जास्तीच्या जागा आल्या. 2024 ला देखील सगळे रेकॉर्ड मोडतील. 140 कोटी जनता मोदींच्या पाठिशी आहेत. 2024 ला सगळे रेकॉर्ड मोडतील - एकनाथ शिंदे

लोकशाहीचं हे पवित्र मंदिर आहे. लोकशाही टिकवायची असेल तर त्यांनी सहभागी व्हायला हवं होतं. सगळे एकत्र? 2019 ला देखील सगळे एकत्र आले होते. पण पालापाचोळ्यासारखे उडून गेले - एकनाथ शिंदे

- या कार्यक्रमासाठी सगळ्यांना निमंत्रण पाठवलं होतं, सर्व जण तिथे आले होते. सर्व जातीपाती-धर्माचे लोक कार्यक्रमाला होते. कोणालाही डावलण्यात आलं नाही. पण कावीळ झालेल्या लोकांना सगळं पिवळं दिसतं. आजच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहीजे होतं पण दुर्देव आहे - एकनाथ शिंदे

- "भव्य-दिव्य इमारत सक्षमीकरणासोबतच देशाच्या समृद्धी, सामर्थ्याला नवी गती, बळ देईल"

- आजचा दिवस आपल्या सर्व देशवासियांसाठी अविस्मरणीय आहे. संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांना अभिमानाने आणि आशेने भरून टाकणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही दिव्य आणि भव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणासोबतच देशाच्या समृद्धी आणि सामर्थ्याला नवी गती आणि बळ देईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी



-

चर्चा पूर्णपणे त्यांच्या सोयीप्रमाणे, विरोधी पक्ष त्यांना सोयीप्रमाणे लागतो आणि सोयीप्रमाणे तो त्यांच्या कामाचा नसतो. हे दुर्दैवी असून लोकशाहीसाठी घातक आहे - सुप्रिया सुळे 

- नऊ वर्षात अनेकदा असं झालं आहे की सरकारमधले महत्त्वाचे मंत्री, त्यांना जेव्हा बिल पास करायचे असतात. तेव्हा या देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी फोन केलेले आहेत. त्यामुळे असं काही नाही - सुप्रिया सुळे

- ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असले पाहिजेत आणि सर्वांचा समन्वय साधूनच देश चालतो - सुप्रिया सुळे

"संसदेचा इव्हेंट करू नका, ही लोकशाही आहे, दडपशाही नाही"; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

नवीन संसद भवनाच्या व्हिडिओला शाहरुख खानने दिला आवाज

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

- नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचा दुसरा टप्पा 12 च्या सुमारास सुरू होणार. 

- Video - पंतप्रधान मोदींचा साधूसंतांच्या उपस्थितीत सेंगोलला साष्टांग नमस्कार

- संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी मजूर म्हणाले...

दिल्लीत उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात

- संसदेची नवीन इमारत बांधणाऱ्या कामगारांचा पंतप्रधान मोदींनी केला सन्मान

- नव्या संसद भवनाचा उद्धाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या नव्या वास्तुचे उद्धाटन झाले.

- नव्या संसद भवनाच्या बाहेर सर्व-धर्म प्रार्थना, मोदींसह सर्व मान्यवरांची उपस्थिती

- लोकसभा सभागृहात बसवल्या जाणाऱ्या सेंगोलचे पूजन केले. 

- पूजाविधी करून पारंपरिक सेंगोल मोदींकडे दिला जाणार असून नंतर तो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल.

- नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाच्या उद्घाटनासाठीच्या पूजेला सुरुवात झाली आहे.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल

- २१ राजकीय पक्षांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकला असल्यामुळे ५५० पेक्षा अधिक खासदार उपस्थित राहणार नाहीत, असा अंदाज आहे. रालोआच्या सदस्य पक्षांसह २५ पक्ष कार्यक्रमात सहभागी होतील. 

- बसपा प्रमुख मायावती यांनी आपल्या सर्व १० खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, कुंवर दानिश अली यांच्यासह ४ बसपा खासदारांनी कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते.

Web Title: New Parliament Building Inauguration LIVE: PM Modi Inaugurates New Sansad Bhavan After Grand Pooja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.