नवा मोटार वाहन कायदा कठोर

By Admin | Updated: September 14, 2014 02:08 IST2014-09-14T02:08:14+5:302014-09-14T02:08:14+5:30

वाहतूक नियम मोडणा:यांना यापुढे कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

New Motor Vehicle Act Rigorous | नवा मोटार वाहन कायदा कठोर

नवा मोटार वाहन कायदा कठोर

नवी दिल्ली : वाहतूक नियम मोडणा:यांना यापुढे कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. हलगर्जीपणाने गाडी चालवल्याने बालकाचा मृत्यू झाल्यास तीन लाख रुपयांर्पयत दंड आणि किमान सात वर्षाच्या कारावासाची तरतूद नव्या मोटार विधेयकात आहे. विविध प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठय़ा प्रमाणात दंड वसूल केला जाईल.
 रस्ते सुरक्षा आणि वाहतूक विधेयक 2क्14 आणले जाणार असून त्यात वाहनाची बांधणी सदोष आढळून आल्यास प्रत्येक वाहनानुसार 5 लाख रुपये दंड तसेच हलगर्जीने किंवा बेदरकारपणो वाहन चालविल्याचे आढळून आल्यास परवाना रद्द करण्यासारख्या कडक उपाययोजना आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रलयाने या विधेयकाचा मसुदा शनिवारी जारी करताना संबंधितांकडून सूचना मागविल्या आहेत. वाहन असुरक्षितरीत्या वापरल्याचे आढळून आल्यास एक लाख रुपयांचा दंड, सहा महिन्यांच्या कारावासाची तरतूद असून कारावास एक वर्षार्पयत वाढविता येऊ शकतो किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
स्कूल बस चालकांसाठी कठोर नियम स्कूलबसचा चालक दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास 5क् हजार रुपये दंड ,तीन वर्षाचा कारावास तसेच 18 ते 25 वर्षे वयोगटातील चालक असेल तर परवाना तडकाफडकी रद्द करण्याची तरतूद आहे. काही परिस्थितीत बालकाचा मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये दंड, किमान सात वर्षे कारावासाची शिक्षा असेल. तीन वेळा सिगAल तोडल्यास 15 हजार रुपये दंड,महिन्यासाठी परवाना रद्द तसेच प्रशिक्षण पार पाडण्याचे बंधन असेल, असे या विधेयकाच्या मसुद्यात म्हटले आहे.
दंड आकारण्यासाठी श्रेणी निश्चित केली. या विधेयकाबाबत मंत्रलयाने सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मागितल्या आहेत. त्यानंतर येत्या हिवाळी अधिवेशनात ते संसदेत सादर केले जाईल. पहिल्या पाच वर्षात अपघाती मृत्यूचे प्रमाण दोन लाखांर्पयत कमी करण्याचा उद्देश आहे. रस्ते वाहतुकीची सुरक्षा वाढविल्यास सकल राष्ट्रीय उत्पन्नात 4 टक्के सुधारणा होईल, असे सरकारला वाटते. या क्षेत्रत गुंतवणूक वाढल्यास 1क् लाखांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल. देशभरात वर्षभरात 5 लाखांवर अपघात होत असून किमान 1.4 लाख लोक मृत्युमुखी पडतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्दारूपिऊन वाहन चालविणा:याला 25 हजार रुपये दंड तसेच तीन महिन्यांचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याशिवाय 6 महिने परवाना निलंबित राहील.
 
च्तीन वर्षात दुसरा गुन्हा केल्यास 5क् हजार रुपये दंड किंवा एक वर्षार्पयत कारावास किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा ठोठावली जाईल. परवाना वर्षभरासाठी निलंबित राहील. त्यानंतर लगेच गुन्हा केल्यास परवाना रद्दच केला जाईल. वाहनही एक महिन्यासाठी जप्त केले जाईल.
 
देशभरात सुरक्षित, प्रभावी, कमी खर्चाची वाहतूक पुरविण्यासह वाहतुकीचा वेग वाढविण्याचा उद्देश आहे. वाहतूक क्षेत्रत पारदर्शकता वाढविण्यासाठी आमचा ई- गव्हर्नन्सवर भर असेल. अपघातातील बळींना त्वरित मदत तसेच लाखो लोकांचे प्राण वाचविण्यात नव्या कायद्यामुळे मदत होईल. 
- नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (टि¦टरवर प्रतिक्रिया)

 

Web Title: New Motor Vehicle Act Rigorous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.