शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

काश्मिरात नवी दहशतवादी संघटना; TRF ने घेतली हंदवाडा हल्ल्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 15:21 IST

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देहल्ल्यात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना हौतात्म्य आले होतेलष्कर ए तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटने घेतली हंदवाडा हल्ल्याची जबाबदारीटीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला

नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कर ए तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना हौतात्म्य आले.

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे. वर्चस्वाच्या या लढाईतूनच टीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला. त्यांनी या हल्ल्याची जबाबदारीही घेतली आहे.

लष्कराला मोठं यश, दहशतवादी संघटनेच्या टॉप कमांडरचा खात्मा

उत्तर-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडाच्या चांजमुल्ला भागात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना बंधक बनवले होते. मिळेलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या एका तुकडीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेरले आणि सर्व नागरिकांना सोडवले. जेव्हा बंधक नागरिकांना सोडवण्यात येत होते. तेव्हाच दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. यानंतर लष्करानेही प्रत्युत्तर दिले. यात लष्कराचे अधिकारी कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनूज यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आले.

कर्नल आशुतोष यांनी यापूर्वी अनेक मोहिमा केल्या होत्या यशस्वी - चांजमुल्ला भागात शनिवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर, लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस उपनिरीक्षकाला हौतात्म्य आले. यातील कर्नल आशुतोष शर्मा यांनी यापूर्वी दहशतवाद्यांविरोधातील अनेक कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मात्र, या कारवाईत त्यांना हौतात्म्य आले.

CoronaVirus News: कोरोना जाणार नाही, त्याच्यासोबतच जगणं शिकावं लागेल, केजरीवालांनी सांगितला अॅक्शन प्लॅन  

गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांनी जोर धरला आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला जात आहे. यापूर्वी पुलवामाच्या डांगरपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशनदरम्यान तेथे लपून असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSoldierसैनिकPoliceपोलिस