शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

देशाच्या सार्वभौमत्व अन् प्रादेशिक अखंडतेत कोणतीही तडजोड नाही, भारतानं नेपाळला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 11:12 IST

देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेत अशी ढवळाढवळ किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटातही नेपाळनं भारताच्या भूभागावर दावा करणारा नकाशा तयार केल्यानं दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे. नेपाळ चीनच्या दबावाखाली येऊन असं करत असल्याचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा आहे.नेपाळनं आपल्या नकाशात भारताचा भूभाग दाखवल्यानं परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटातही नेपाळनंभारताच्या भूभागावर दावा करणारा नकाशा तयार केल्यानं दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे. नेपाळ चीनच्या दबावाखाली येऊन असं करत असल्याचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा आहे. नेपाळनं आपल्या नकाशात भारताचा भूभाग दाखवल्यानं परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेत अशी ढवळाढवळ किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे.परराष्ट्र मंत्रालयानं म्हटले आहे की, या सीमा वादावर वाटाघाटीद्वारेच तोडगा काढावा लागेल. वस्तुतः लिपुलेख ते कैलास मानसरोवर या मार्गाचे संरक्षणमंत्र्यांनी उद्घाटन केले, तेव्हा नेपाळने त्याला विरोध दर्शविला. नेपाळ हा भाग आपला असल्याचा दावा करत आहे. नेपाळची ही कृती एकांगी आणि तथ्यहीन आहे. त्याला कुठलाही आधार नाही. नेपाळ नवीन नकाशा जारी करून सीमा संबंधित वाद उभय देशांतील द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवण्याच्या विरोधात आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, नेपाळने जारी केलेला नवीन नकाशा कोणत्याही आधारावर टिकून नाही. ही बाब दोन्ही बाजूंनी बोलणी करून सोडविली पाहिजे. अशा प्रकारची कारवाई भारत कधीही स्वीकारणार नाही. नेपाळने भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि क्षेत्रीय अखंडतेचा आदर केला पाहिजे. नेपाळच्या नेतृत्वाशी बसून बोलू शकू, असे वातावरण तयार केले पाहिजे, असंही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. तत्पूर्वी भारत सरकारनं विरोध केल्यानंतरही नेपाळ सरकारनं नवा राजकीय आणि प्रशासकीय नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशातून नेपाळनं लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरामधल्या एकूण ३९५ चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर दावा सांगितला आहे. हा संपूर्ण भाग भारतीय हद्दीत येतो. नेपाळच्या भू व्यवस्थापन आणि सुधारणा मंत्री पद्मा अरयाल यांनी सरकारच्या वतीनं नवा नकाशा प्रसिद्ध केला. नवा नकाशा प्रसिद्ध करुन लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुराला आपल्या भागात दाखवू, अशी घोषणा नेपाळ सरकारनं आधी केली होती. त्यानंतर आज नेपाळनं नवा नकाशा जारी केला. आता सर्व सरकारी कार्यालयं आणि शाळांमध्ये या नकाशाचा वापर केला जाईल. नवा नकाशा लवकरच संसदेसमोर ठेवला जाईल आणि त्याला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती अरयाल यांनी दिली होती. 

हेही वाचा

पाकला चुना! चिनी कंपन्यांनी 60 अब्जांची गुंतवणूक करून कमावला 400 अब्ज रुपयांचा नफा

...म्हणून चीन अफवा पसरवतो, डोनाल्ड ट्रम्प यांनी साधला निशाणा 

एका कुटुंबाला कचऱ्यात सापडल्या दोन बॅगा अन् उघडून पाहतात तर काय...

CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका

CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारत