शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

केंद्र सरकार नवीन आयकर विधेयक का आणले? अखिलेश यादव यांची बोचरी टीका; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:40 IST

New Income Tax Bill 2025: केंद्र सरकार आज नवीन आयकर विधेयक सादर करत आहे.

New Income Tax Bill 2025: केंद्रातील मोदी सरकार आज(13 फेब्रुवारी) नवीन आयकर विधेयक सादर करणार आहे. या विधेयकावरुन संसदेत बराच गदारोळ सुरू असून, विरोधी खासदार या विधेयकावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या विधेयकावर प्रतिक्रिया देताना नवीन विधेयक सादर करण्याचे कारण सांगितले आणि सरकारवर निशाणा साधला.

केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करताना अखिलेश यांनी मोठा दावा केला. एक्सवर पोस्ट करत सपा प्रमुख म्हणाले, अनेक लाख कोटींच्या बजेटनंतरही जनतेच्या चेहऱ्यावरील निराशा हटलेली नाही. त्यामुळे त्यांचे लक्ष इतरत्र नेण्यासाठी नवीन विधेयक आणले जात आहे. पण, लोक हुशार झाले आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

नवीन आयकर विधेयकात काय आहे?केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेत आयकर विधेयक, 2025 सादर केले. आयकर कायद्याचे एकत्रीकरण आणि सुधारणा करण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणले आहे. हा बदल भाषा सुलभ करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असेल. यासोबतच तरतुदी आणि खुलासेही काढले जातील. नवीन विधेयकात 536 विभाग, 23 प्रकरणे आणि 16 अनुसूची आहेत. ते फक्त 622 पानांवर दिले आहेत. यामध्ये कोणताही नवा कर लावण्याची चर्चा नाही. हे विधेयक विद्यमान आयकर कायदा, 1961 ची भाषा सुलभ करते. सहा दशके जुन्या असलेल्या विद्यमान कायद्यात 298 कलमे आणि 14 अनुसूची आहेत. हा कायदा आला तेव्हा त्यात 880 पाने होती.

नव्या विधेयकात फ्रिंज बेनिफिट टॅक्सशी संबंधित अनावश्यक कलमे हटवण्यात आली आहेत. विधेयक 'स्पष्टीकरण किंवा तरतुदींपासून' मुक्त असल्याने ते वाचणे आणि समजणे सोपे आहे. यासोबतच आयकर कायदा 1961 मध्ये अनेक वेळा वापरण्यात आलेले काही शब्द नव्या विधेयकात काढून टाकण्यात आले आहेत. नवीन विधेयकात 'करदात्यांची सनद' देखील प्रदान करण्यात आली आहे ज्यात करदात्यांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांची रुपरेषा दिली आहे. या विधेयकात, आयकर कायदा, 1961 मध्ये नमूद केलेल्या 'मागील वर्ष' या शब्दाच्या जागी 'कर वर्ष' हा शब्द टाकण्यात आला आहे. तसेच मूल्यांकन वर्ष ही संकल्पनाही रद्द करण्यात आली आहे. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी