कर्नाटक, केरळ, तामिळनाडू नवे हॉटस्पॉट, महाराष्ट्र, दिल्ली पिछाडीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:17 AM2021-05-08T05:17:29+5:302021-05-08T05:18:15+5:30

केंद्र सरकार चिंताग्रस्त; महाराष्ट्र, दिल्ली पिछाडीला

New hotspots in Karnataka, Kerala, Tamil Nadu | कर्नाटक, केरळ, तामिळनाडू नवे हॉटस्पॉट, महाराष्ट्र, दिल्ली पिछाडीला

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू नवे हॉटस्पॉट, महाराष्ट्र, दिल्ली पिछाडीला

googlenewsNext

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रमधील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली व दिल्लीतील रुग्णसंख्या घटली आहे. मात्र कर्नाटक, केरळ, तामिळनाडू हे आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. त्याची चिंता आता केंद्र सरकारला सतावू लागली आहे. या तीन राज्यांत गेल्या ६ दिवसांत रुग्णसंख्या २० टक्क्यांनी वाढली आहे.

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेतच पण त्यानंतर कर्नाटकने दुसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या क्रमवारीत केरळ तिसऱ्या व तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये रुग्णांच्या संख्येत घट होत आहे तर दक्षिण भारतात आंध्र प्रदेशसहित चार राज्यांमध्ये सहा दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे. 

वाढता वाढता वाढे...
n    कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णसंख्या १ मे रोजी ४०,९९० होती. ती ६ मे रोजी ४,९०,०५८ वर पोहोचली. ही रुग्णवाढ २१ टक्के होती. या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २९ टक्के असून ते देशात सर्वाधिक आहे. तरीही तिथे ही परिस्थिती ओढवली आहे. 
n    केरळमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २० टक्के आहे. कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणाऱ्या राज्यांमध्ये केरळ आघाडीवर होते. तिथे लसीकरण व कोरोना चाचण्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक होते. पण आता केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 
n    महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसांत १३ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे.

देशात कोरोनाचे ४ लाख १४ हजार नवे रुग्ण

n    देशात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या  २४ तासांत कोरोनाचे नवे चार लाख १४ हजार १८८ रुग्ण नोंद झाले, तर ३,९१५ जणांचा मृत्यू झाला.
n    या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३६ लाख ४५ हजार १६४ झाली  आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. 

n    उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येत १६.९६ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर देशाचा ८१.९५ टक्क्यांवर आला. एक कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण बरे झाले, तर मृत्यूचा दर एकूण रुग्णसंख्येत १.०९ टक्के आहे.

दिल्लीत रुग्ण बरे होण्याचे कमी प्रमाण
n    दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७ टक्के असून कोरोनाचा नवीन विषाणू अधिक घातक आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोना चाचण्या व लसीकरण करण्याचा वेग धीमा आहे. तामिळनाडूमध्येही कोरोना रुग्णसंख्येत १ मे ते ६ मे या कालावधीत २०.८ टक्के वाढ झाली आहे. 
n    महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसांत १३ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. 

 

 

Web Title: New hotspots in Karnataka, Kerala, Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.