शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारपूरक विकास अन् राष्ट्रवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू- राजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 19:43 IST

भविष्यात रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार; राजन यांचं विश्लेषण

नवी दिल्ली: रोजगार देणारा आर्थिक विकास आणि राष्ट्रवाद हे दोन वेगवेगळे मुद्दे नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. येत्या काळात रोजगार निर्माण करणारा आर्थिक विकास न झाल्यास देशाला अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. टाईम्स ऑफ इंडियासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. बांधकाम क्षेत्रात येत्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. आर्थिक आघाडीवर अपयश आल्यास काय काय होऊ शकतं, हे राजन यांनी लेखात स्पष्ट केलं. 'आर्थिक विकास साधण्यात अपयशी ठरल्यास आपल्याकडे सैन्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रं नसतील. देशावर हल्ला करुन पळून गेलेल्या दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण घडवून आणण्याची क्षमता नसेल,' असं राजन यांनी लेखात नमूद केलं आहे. 'आपण रोजगारनिर्मिती करणारा आर्थिक विकास करण्यात अपयशी ठरल्यास देशात भूकंपासारखी परिस्थिती निर्माण होईल. कारण त्यामुळे देशातील तरुण पिढी तणावाखाली असेल. त्यांच्याकडून कुठे ना कुठे हा तणाव काढला जाईल,' अशी भीती त्यांनी व्यक्त केली. रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक विकासाशिवाय राष्ट्रीय सुरक्षा शक्य नाही, असं मत राजन यांनी व्यक्त केलं. राजन यांनी त्यांच्या लेखात येत्या काळात कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण होतील, याचंही विश्लेषण केलं आहे. 'रोजगार वाढवण्यासाठी आपल्याला आर्थिक विकास दराचा वेग वाढवावा लागेल. रोजगार देणाऱ्या क्षेत्रांकडे लक्ष केंद्रीत करावं लागेल. बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. परवडणारी घरं, रस्ते, रेल्वे, बंदरं, विमानतळांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात अर्धकुशल कामगारांची आवश्यकता भासेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. मात्र जमीन अधिग्रहणच्या किचकट प्रक्रियेमुळे हा क्षेत्राला गती मिळत नाही,' असं राजन यांनी लेखात म्हटलं आहे. 

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनReal Estateबांधकाम उद्योग