Budget 2018- लक्झरीअस लाईफ महागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 14:41 IST2018-02-01T14:39:14+5:302018-02-01T14:41:01+5:30
लक्झरीअस लाईफ जगणं या बजेटनंतर महाग होणार आहेत.

Budget 2018- लक्झरीअस लाईफ महागली
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज देशाचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. टॅक्स स्लॅब अर्थात कररचनेत कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यामुळे कररचनेत बदल होईल, अशी अपेक्षा असणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांची निराशा झाली आहे.
विशेष म्हणजे लक्झरीअस लाईफ जगणं या बजेटनंतर महाग होणार आहेत. हेल्थी पदार्थांना प्राधान्य देणारे लोक फ्रुट ज्युस, व्हेजिटेबल ज्युसकडे जास्त वळतात. तेही यावर्षात महाग होणार आहे. तसंच परफ्युम, कॉस्मेटिक्स, सौंदर्यप्रसाधने, कार आणि टू व्हीलर अॅक्सेसरीज, इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड्स, व्हीडीओ गेम, गॉगल, मेनिक्युअर, पेडिक्युअर, सनस्क्रीन, दाढी करण्याचं सामान, दाढी केल्यानंतरत सामान या सगळ्या वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे लक्झरीअस लाईफस्टाईलकडे कल असणाऱ्यांना या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील. सौदर्यप्रसाधनं नेहमी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. तसंच सिगारेट, सिगारेट लायटर महागलं आहे.