शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

नवा ग्राहक संरक्षण कायदा सोमवारपासून, दंडाखेरीज प्रथमच तुरुंगवासाचीही तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 5:42 AM

संसदेने संमत केल्यानंतर गेल्या वर्षी ९ आॅगस्ट रोजी या नव्या कायद्यास राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. आता हा कायदा लागू केला जात आहे.

नवी दिल्ली : स्वर्गीय राजीव गांधी यांच्या राजवटीतील १९८६ चा ग्राहक संरक्षण कायदा पूर्णपणे रद्द करून त्याची जागा घेण्यासाठी मोदी सरकारने केलेला नवा कायदा २० जुलै म्हणजे येत्या सोमवारपासून देशभर लागू होणार आहे.ग्राहक तक्रारींची वाढविलेली व्याप्ती, ग्राहक न्यायालयांना दिलेले वाढीव अधिकार, केवळ दंड किंवा भरपाईऐवजी सदोष किंवा बनावट उत्पादनाबद्दल उत्पादक वा विक्रेत्यास तुरुंगातही धाडणे, फसव्या अथवा अतिरंजित जाहिरातींबद्दल उत्पादकाप्रमाणेच ती जाहिरात करणाऱ्या ‘सेलेब्रिटीं’नाही जबाबदार धरणे आणि दाव्याचा निकाल देण्यापूर्वी प्रकरण मध्यस्थीने सोडविण्याचा प्रयत्न करणे ही या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

संसदेने संमत केल्यानंतर गेल्या वर्षी ९ आॅगस्ट रोजी या नव्या कायद्यास राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. आता हा कायदा लागू केला जात आहे. कायद्यात एकूण १०१ कलमे आहेत.ग्राहक न्यायालयांचे वाढीव अधिकार : जिल्हा ग्राहक मंच- २० लाखांवरून एक कोटी रु. राज्य आयोग- एक कोटीवरून १० कोटी रु. आणि राष्ट्रीय आयोग- १० कोटी रुपयांच्या पुढे अमर्याद.फसव्या जाहिराती: १० लाखांपर्यंत भरपाई, पाच वर्षांपर्यंत कैद आणि/पाच लाखांपर्यंत दंड. जाहिरात करणारे ‘सेलिब्रिटी’ही जबाबदार.भेसळयुक्त उत्पादन : इजा वा मृत्यू न झाल्यास सहा महिने कैद व एक लाख रुपयांपर्यंत दंड. किरकोळ इजा झाल्यास एक वर्षापर्यंत कैद व तीन लाख रुपयांपर्यंत दंड, गंभीर इजा झाल्यास सात वर्षांपर्यंत कैद व पाच लाख रुपयांर्पंत दंड आणि मृत्यू झाल्यास सात वर्षे ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा व १० लाख रुपयांपर्यंत दंड. पहिलाच गुन्हा असल्यास उत्पादकाचा परवाना दोन वर्षांसाठी व नंतरच्या गुन्ह्यासाठी कायमचा रद्द.बनावट उत्पादन: किरकोळ इजेसाठी एक वर्षापर्यंत कैद व तीन लाख रुपयांपर्यंत दंड. गंभीर इजा झाल्यास सात वर्षांपर्यंत कैद व पाच लाख रुपयांपर्यंत दंड व मृत्यू झाल्यास जन्मठेपेर्यंतची शिक्षा व १० लाख रुपयांपर्यंत दंड. वस्तू वा सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता यासाठी उत्पादक वा पुरवठादार पूर्णपणे जबाबदार.

टॅग्स :Courtन्यायालय