नवे कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्या फायद्याचे- पंतप्रधान नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 07:28 AM2021-02-17T07:28:43+5:302021-02-17T07:29:07+5:30

Narendra Modi : लढावू राजे सुहेलदेव  यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ मंगळवारी मोदी यांच्या हस्ते बहैरीच जिल्हयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.

New agricultural laws benefit small farmers: PM Narendra Modi | नवे कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्या फायद्याचे- पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नवे कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्या फायद्याचे- पंतप्रधान नरेंद्र मोदी 

googlenewsNext

लखनौ : नवे कृषी कायदे हे लहान आणि अत्यल्प भूधारकांना फायद्याचे ठरतील आणि जे लोक या नव्या कायद्यांबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत त्यांना हे शेतकरीच उघडे पाडतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
लढावू राजे सुहेलदेव  यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ मंगळवारी मोदी यांच्या हस्ते बहैरीच जिल्हयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. यापूर्वीच्या सरकारांनी सन्माननीय योद्धे आणि नेत्यांचा सन्मान न केल्याची चूक आमचे सरकार दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही मोदी म्हणाले. ते म्हणाले की, विदेशी कंपन्यांना आणण्यासाठी ज्यांनी कायदे बनवले तेच लोक आता राष्ट्रीय कंपन्यांच्या नावाने भीती निर्माण करीत आहेत. नवे कृषी कायदे हे लहान आणि अत्यल्प भूधारकांना फायद्याचे असतील आणि नव्या कायद्यांमुळे चांगले अनुभव हे उत्तर प्रदेशातून येत आहेत, असे ते म्हणाले. नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी वरील भाष्य केले. महाराजा सुहेलदेव यांच्या कामगिरीला इतिहासांच्या पुस्तकांत योग्य ते महत्व दिले गेले नाही. 

Web Title: New agricultural laws benefit small farmers: PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.