शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नव्या १० टक्के आरक्षणाला लगेच सुप्रीम कोर्टात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 06:47 IST

जनहित याचिका; राज्यघटनेचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप

नवी दिल्ली: उच्च जातीतील आर्थिक दुर्बलांना नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची तरतूद करणारे घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत बुधवारी संमत झाल्यानंतर लगेच गुरुवारी त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. हे आरक्षण न्यायालयीन कसोटीवर टिकण्याविषयी साशंकता व्यक्त होत होतीच. आता त्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी होईल, असे दिसते. महाराष्ट्रातील अ‍ॅड. जयश्री पाटील यांचीही याचिका सादर झाली.

राष्ट्रपतींची मंजुरी व देशातील किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांची संमती मिळाल्यानंतर हे आरक्षण लागू होईल. परंतु त्याआधी ‘यूथ फॉर इक्वालिटी’ या संस्थेने अ‍ॅड. सेंदिल जगदीशन यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. काही दिवसांत ती न्यायालयापुढे येऊन सुनावणीचे ठरेल. या दुरुस्तीने राज्यघटनेत अनुच्छेद १५(६) व १६(६) यांचा नव्याने अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांसाठी आरक्षणासह विशेष तरतुदी करण्याचा अधिकार सरकारला प्राप्त होईल. हे आर्थिक दुर्बल घटक अनुसूचित जाती व जमातींखेरीज अन्य समाजातील असतील. त्यांच्यासाठी वेगळे १० टक्के आरक्षण ठेवले जाईल. हे आरक्षण विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांतील प्रवेशांनाही लागू होईल. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, यादुरुस्त्या राज्यघटनेच्या मूळ ढांचाच खिळखिळा करणाºया आहेत. संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी ज्याने मूळ ढांचाला धक्का पोहोचेल, अशी दुरुस्ती संसद करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निकाल आहेत.उपस्थित केलेले काही महत्त्वाचे मुद्देकेवळ आर्थिक निकषांवर आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने १९९२ मध्येच दिला आहे.समानता व सर्वांना समान वागणूक हे राज्यघटनेचे मूलतत्त्व आहे. त्यामुळे आर्थिक आरक्षण सर्वांसाठी द्यावे लागेल. अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणाचे लाभ त्यांच्यातील पुढारलेलेच घेत आले आहेत. आता या आर्थिक निकषांवरील मर्यादित आरक्षणाने त्यांच्यामधील दुर्बलांना दुहेरी फटका बसेल.५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने समानतेचा भंग होईल. घटनेच्या मूलभूत ढांचाला सुरुंग लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये स्पष्ट केले आहे.खासगी विनाअनुदानित शिक्षणसंस्था सरकारी मदत घेत नसल्याने सरकार त्यांच्यावर आरक्षण लादू शकत नाही. गुणवत्तेवर प्रवेश देण्याच्या त्यांच्या हक्कात सरकार हस्तक्षेपही करू शकत नाही, असे न्यायालायच्या घटनापीठानेदोन प्रकरणांत स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय