नेताजींचे सहायक होते सोव्हिएतचे गुप्तहेर
By Admin | Updated: October 26, 2014 01:53 IST2014-10-26T01:53:28+5:302014-10-26T01:53:28+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहायक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘जुने मित्र’ म्हणून ओळखले जाणारे एसीएन नाम्बियार हे सोव्हिएत संघाचे गुप्तहेर म्हणून कार्यरत होते.

नेताजींचे सहायक होते सोव्हिएतचे गुप्तहेर
लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहायक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘जुने मित्र’ म्हणून ओळखले जाणारे एसीएन नाम्बियार हे सोव्हिएत संघाचे गुप्तहेर म्हणून कार्यरत होते. ब्रिटिश दस्तऐवजांमध्ये हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
ब्रिटनच्या राष्ट्रीय अभिलेखागाराने काही गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक केले आहेत. त्यानुसार नाम्बियार 1924 मध्ये एक पत्रकार म्हणून बर्लिनला गेले होते आणि तेथे त्यांनी भारतीय कम्युनिस्ट संघटनेसोबत मिळून काम केले होते. एवढेच नाही तर 1929 साली त्यांनी सोव्हिएतच्या निमंत्रणावरून मॉस्को दौराही केला होता. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर नाम्बियार यांची जर्मनीतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, नंतर त्यांना बोस यांचे सहायक म्हणून बर्लिनला येण्याची परवानगी देण्यात आली, असे या दस्तऐवजात म्हटले आहे. या दस्तऐवजात पुढे म्हटले की, काही काळानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस हे जपानशी संबंध दृढ करण्यासाठी जर्मनीच्या दुर्गम भागात गेले, तर नाम्बियार यांना युरोपातील आझाद हिंद सेनेची आर्थिक धुरा सोपविण्यात आली. 1944 साली सोव्हिएत संघाने भारतीय सैन्य समूहाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. भारतीय युद्धकैद्यांना सोबत घेऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘त्या’ भारतीय सैन्य दलाशी नाम्बियार यांचा संबंध होता, असा दावा अभिलेखागाराद्वारे जारी प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
नाम्बियार यांना जून 1945 मध्ये ऑस्ट्रियात अटक करण्यात आली आणि नाझींशी हातमिळवणी असल्याच्या आरोपावरून त्यांची विचारपूस करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
गोपनीय घडामोडींची जबाबदारी
4 दुस:या महायुद्धानंतर नाम्बियार स्वीत्ङरलडच्या बर्न येथील भारतीय दूतावासात वाणिज्यदूत व स्कँनडेनव्हियात राजदूत म्हणून कार्यरत होते.
4 पश्चिम जर्मनीला जाऊन ‘हिंदुस्तान टाइम्स’चे युरोपियन प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. दस्तऐवजानुसार नाम्बियार यांची औद्योगिक गोपनीय घडामोडींचे वार्ताकन करण्यासाठी येथे नियुक्ती करण्यात आली होती.
दस्तऐवजात पत्रंचा समावेश
4ब्रिटिश दस्तऐवजात युरोप व जर्मनीतील नेताजींच्या आझाद हिंद सेनेशी संबंधित घडामोडींची नामावली व सविस्तर माहिती आहे.
4 नाम्बियार यांनी बोस यांना लिहिलेल्या पत्रंचाही दस्तऐवजात उल्लेख आहे. यू-बोट 234 या पाणबुडीतून हा पत्रव्यवहार जप्त करण्यात आला होता.