शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:47 IST

बिहारमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाआघाडीविरुद्ध एनडीए अशी थेट लढत होईल.

पटणा - बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यातच Poll Tracker ओपिनियन पोलमध्ये हैराण करणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार राज्यातील युवकांमध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून राहुल गांधी यांचं नाव पुढे आले आहे. तुमचा आवडता राष्ट्रीय नेता कोणता असा प्रश्न युवकांना विचारला होता. त्यावर ४७ टक्के युवकांनी राहुल गांधी यांचे नाव घेतले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३९ टक्के युवकांनी पसंती दर्शवली तर १४ टक्के युवकांनी इतर नावाला पसंती दिली.

NDA आणि महाआघाडीत लढत

बिहारमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाआघाडीविरुद्ध एनडीए अशी थेट लढत होईल. परंतु या निवडणुकीत अनेक समीकरणे बदलले आहेत. जानेवारी २०२४ मध्ये नितीश कुमार यांनी महाआघाडीची साथ सोडून एनडीएसोबत गेलेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवे वळण लागले. भाजपा आणि जेडीयू यांनी मिळून राज्यात सरकार बनवले. नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून मैदानात उतरले. दुसरीकडे विरोधकांकडून महाआघाडीचे नेतृत्व तेजस्वी यादव करू शकतात. 

काँग्रेस निर्णायक भूमिकेत 

Poll Tracker सर्व्हेनुसार, बिहारच्या युवकांमध्ये राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली आहे. ४७ टक्के युवकांची पहिली पसंती राहुल गांधी यांच्या नावाला आहे. त्यामुळे यंदाच्या बिहार निवडणुकीत काँग्रेस सहकार्याच्या नव्हे तर निर्णायक भूमिकेत दिसू शकते. काँग्रेसने अद्यापही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा स्पष्ट केला नाही. त्यामुळे महाआघाडीत अद्याप संभ्रम आहे. 

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीही मजबूतपणे उतरणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची मोठी भूमिका राहू शकते. बिहारमध्ये तिसरा पर्याय म्हणून प्रशांत किशोर यांना लोक किती साथ देतात हे निवडणुकीच्या निकालातूनच दिसून येईल. मात्र प्रशांत किशोर यांच्या राजकारणामुळे एनडीएसह महाआघाडीलाही आव्हान निर्माण झाले आहे.  

टॅग्स :BiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस