शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही नेहरूंची हिमालयापेक्षा मोठी चूक - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:44 IST

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची हिमालयापेक्षा मोठी चूक होती, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची हिमालयापेक्षा मोठी चूक होती, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. तथापि, काश्मीरमध्ये निर्बंध आहेत कुठे? ते तर तुमच्या मनात आहेत, असा टोला अमित शहा यांनी ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना रविवारी लगावला आहे.३७० कलम रद्द करण्याचा निर्णय व काश्मीर या विषयावर माजी सनदी अधिकाऱ्यांच्या संकल्प या संस्थेने दिल्लीतील नेहरू स्मृती वस्तुसंग्रहालय व ग्रंथालयामध्ये आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. संकल्प ही रा. स्व. संघ परिवारातील एक संघटना आहे. अमित शहा म्हणाले की, दोन्ही देशाशी संबंधित प्रश्नावर संयुक्त राष्ट्रात जाण्याचा नेहरु यांचा व्यक्तीगत निर्णय चूकच होती. तेथेही काश्मिर वादग्रस्त क्षेत्रासारखे सादर करण्यात आले. देशाच्या या भागाला पाकिस्तानकडून कब्जा केल्या गेल्याच्या स्वरुपात मांडले असते तर आज याच्या मालकीहक्कावरुन वाद झाला नसता. अमित शहा म्हणाले की, काश्मीरमध्ये निर्बंध असल्याची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेणे ही हिमालयापेक्षा मोठी चूक होती. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे, तसेच जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणे हे अतिशय योग्य निर्णय आहेत.काश्मीरमध्ये लाचलुचपतविरोधी विभागअमित शहा म्हणाले की, ३७० कलमामुळे बालविवाहविरोधी कायदा काश्मीरमध्ये लागू करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे तिथे आठ-दहा वर्षांच्या मुलींचे विवाहही बिनदिक्कतपणे करण्यात येत. ३७० कलमामुळे १०६ केंद्रीय कायदे काश्मीरमध्ये लागू करता येत नव्हते. हे कलम रद्द केल्यानंतरच काश्मीरमध्ये लाचलुचपतविरोधी विभाग स्थापन करणे शक्य झाले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शहाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू