शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:14 IST

"पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले..."

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज संसदेत, ज्या गीताने पारतंत्र्याच्या काळात देशातील जनतेच्या मनात स्वातंत्र्याची धगधगती आग प्रज्वलित ठेवली, अशा बंकिमचंद्र चटोपाध्याय (बंकिमचंद्र चटर्जी) यांनी रचलेल्या 'वंदे मातरम्' या गीतावर चर्चा पार पडली. या चर्चेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही भाग घेतला. दरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर थेट निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंडित नेहरू यांच्या योगदानासंदर्भात भाष्य केले.

काय म्हणाल्या प्रियांका गांधी? -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना प्रियांका म्हणाल्या, "पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले."

नेहरुंनी इस्रोची निर्मिती केली नसती, तर... -पंडित नेहरूंच्या योगदानासंदर्भात बोलताना, "जर नेहरुंनी इस्रोची निर्मिती केली नसती, तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का? असा प्रश्न प्रियांका यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारने एकदा नेहरुंवरही चर्चा करायला हवी, असे आव्हानही त्यांनी दिले. वंदे मातरमवरील चर्चेच्या माध्यमातून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे, प्रदूषण आदी गंभीर मुद्द्यांवर चर्चा न करता सरकार छोटीशी चर्चा करून जनतेची दिशाभूल करत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या चर्चेमागे दोन कारणे...?सरकारवर टीका करत प्रियांका म्हणाल्या, या चर्चेमागे दोन कारणे आहेत. पहिले- पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि दुसरे म्हणजे इतिहासात ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्यावर नवे आरोप लादण्याचा प्रयत्न. तसेच, हे सरकार भविष्याकडे पाहत नाही. खऱ्या समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करणे हाच त्यांचा उद्देश असतो, असेही प्रियांका म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Gandhi slams Modi, compares his tenure to Nehru's jail time.

Web Summary : Priyanka Gandhi criticized PM Modi during a 'Vande Mataram' debate, highlighting Nehru's sacrifices and contributions, including ISRO. She accused the government of distracting from key issues like inflation.
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपा