चंदीगडमध्ये नेहा धुपियाचा अपघात, मदतीऐवजी लोकांनी काढले सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 16:32 IST2017-08-11T16:31:12+5:302017-08-11T16:32:09+5:30
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा अपघात झाला आहे. चंदीगड येथे एका 'शो'च्या प्रमोशनसाठी गेली असताना तिच्या गाडीचा अपघात झाला.

चंदीगडमध्ये नेहा धुपियाचा अपघात, मदतीऐवजी लोकांनी काढले सेल्फी
मुंबई, दि. 11 - बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा अपघात झाला आहे. चंदीगड येथे एका 'शो'च्या प्रमोशनसाठी गेली असताना तिच्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात तीला गंभीर जखम झाली नसल्याची माहिती आहे. स्पॉटबॉयने याबाबत वृत्त दिलं आहे.
'नो फिल्टर नेहा' या शोच्या दुस-या सत्राचं प्रमोशन करून नेहा मुंबईचं विमान पकडण्यासाठी चंदीगड विमानतळावर येत होती, त्यावेळी हा अपघात झाला. विशेष म्हणजे अपघातानंतर तिची मदत करण्याऐवजी तेथे जमलेल्या लोकांनी नेहासोबत सेल्फी काढले. अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती पण तिची मदत करण्याऐवजी सेल्फी आणि स्वाक्षरी घेण्यासाठीच बघ्यांनी गर्दी केली होती.
सुदैवाने या अपघातात नेहा किंवा तिच्या टीममधील कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. मात्र, नेहाच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.