शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

नीट : गुजरातमध्ये छापासत्र! पेपरफुटीप्रकरणी चार जिल्ह्यांत सात ठिकाणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 12:04 IST

ओॲसिस शाळेचे प्राचार्य एहसानुल हक यांना ‘एनटीए’द्वारे ५ मे रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी शहर समन्वयक म्हणून नियुक्त केले होते.

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पदवी राष्ट्रीय चाचणी प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी गुजरातमधील सात ठिकाणी छापे टाकल्याची माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली. आनंद, खेडा, अहमदाबाद आणि गोध्रा या चार जिल्ह्यांत संशयितांच्या ठिकाणांवर सकाळी छापे टाकण्यात आले. सीबीआयने शुक्रवारी झारखंडच्या हजारीबाग येथील एका शाळेचा मुख्याध्यापक,  उपप्राचार्य आणि एका हिंदी वृत्तपत्राच्या पत्रकाराला अटक केली होती. 

ओॲसिस शाळेचे प्राचार्य एहसानुल हक यांना ‘एनटीए’द्वारे ५ मे रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी शहर समन्वयक म्हणून नियुक्त केले होते, तर उपप्राचार्य इम्तियाज आलम यांची एनटीएचे पर्यवेक्षक आणि ओॲसिस शाळेचे केंद्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सीबीआय प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी जिल्ह्यातील आणखी पाच जणांची चौकशी करत आहे. पत्रकार जमालुद्दीन अन्सारी यांना मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  (वृत्तसंस्था)

सरकारने न्यायालयात खोटे सांगितले : काँग्रेस- गुजरातच्या गोध्रा येथील पेपरफुटीचे प्रकरण स्पष्ट झाले असूनही सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत सर्वोच्च न्यायालयात खोटे सांगितले, असा दावा गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष शक्ती सिंह गोहिल यांनी केला आहे.  - गोध्रा सत्र न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्राचा हवाला देत गोहिल यांनी सांगितले की, महाराष्ट्र, ओडिशा, बिहारसह अनेक राज्यांचे विद्यार्थी परीक्षेसाठी गोध्रात आले होते. कारण पेपरफुटीबाबत त्यांची येथे व्यवस्था केली होती. 

‘नीट’ पेपरफुटी ही गंभीर बाब : चिराग पासवान- केंद्रीय मंत्री झाल्यानंतर शनिवारी प्रथमच पाटणा येथे पोहोचल्यानंतर लोजप (आरए) प्रमुख चिराग पासवान यांनी सांगितले की, ‘नीट’पेपरफुटी ही गंभीर बाब आहे आणि सरकार त्यावर गंभीर आहे. सरकार या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल. - हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, शासनाचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांच्यावर विश्वास टाकला असून त्यांना अन्न ग्राहक मंत्री केले असून, या विश्वासावर ते खरे उतरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकGujaratगुजरात