नुकतेच पाच विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. तसंच यासोबत पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर झाले. यामध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, खराब कामगिरीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कागगिरी चांगली करण्याचं सदस्यांना आवाहन केलं आहे. तसंच निवडणुकांच्या निकालांवरून हे स्पष्ट होतंय की काँग्रेसला सुधारणांची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या. आसाम आणि केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला पुन्हा पराभवाचा फटका बसला आहे. "आपल्याला या गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची गरज आहे. आपण खुप निराश आहोत हे म्हणणंदेखील कमी ठरेल," असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी एक टीम तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच त्यांच्याकडून त्वरित रिपोर्ट घेण्यात यावा, असंही त्यांनी नमूद केलं. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
"पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट"; CWC बैठकीत सोनिया गांधींनी व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:18 IST
Congress CWC : नुकतेच जाहीर करण्यात आले ५ विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल. कांग्रेसला करावा लागला पराभवाचा सामना. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली
पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट; CWC बैठकीत सोनिया गांधींनी व्यक्त केलं मत
ठळक मुद्देनुकतेच जाहीर करण्यात आले ५ विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल. कांग्रेसला करावा लागला पराभवाचा सामना