शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन’ने विद्यार्थी, तरुणाईची मोडली मान; स्क्रीन टाइम वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:48 IST

मान, मणका, खांदा, मनगट यांचा त्रास झाला सुरू

- संतोष मिठारी / सतीश पाटीलकोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांबरोबरच शिक्षणात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीचा समावेश झाला आहे. शिक्षण, मनोरंजनासाठी कोल्हापुरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणाईचा स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाइम वाढला आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणजे विद्यार्थी, तरुणाईला मान, खांदा, मनगटदुखीचा त्रास सुरू झाला आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लोकांमध्ये स्मार्टफोनसह अन्य गॅझेटचा वापर वाढला आहे. त्यात विद्यार्थी, तरुणाईचा अधिक समावेश आहे. त्यांचा स्क्रीन टाइम रोज किमान तीन ते चार तासांचा आहे. या गॅझेटचा वापर करताना प्रमाणापेक्षा मान खाली घातल्याने मानेच्या हाडांची झीज होऊन मानदुखीचा त्रास सुरू होतो. मानेवर ताण वाढल्याने त्याचा पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. त्यामुळे सध्या मान, मणका, खांदा, मनगटदुखीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी गॅझेटचा वापर योग्य पद्धतीने आणि गरजेपुरताच करण्याची आवश्यकता आहे.जितकी खाली मान, तितका अधिक ताणसामान्य स्थितीत माणसाच्या डोक्याचे वजन पाच किलो, तर शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्याचे वजन अडीच ते तीन किलोपर्यंत असते. ज्यावेळी मान वाकविली जाते त्यावेळी गुरुत्त्वाकर्षण शक्तीमुळे मानेच्या स्नायूंवर ताण येतो. जितक्या अंशांमध्ये मान ही हनुवटीच्या दिशेने खाली जाईल, तितका अधिक ताण हा मानेवर पडल्याने त्याचा त्रास होतो.घरात ऑनलाइन शिक्षण घेणे अडचणीचेघरात शाळेसारखे वातावरण नसते. विविध अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लक्ष केंद्रित होत नाही. दिवसातून ४ तास आॅनलाइन शिक्षण होते. त्यासाठी नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी स्मार्टफोन घेऊन बसावे लागते. त्यामुळे मान आणि कंबरदुखीचा त्रास होतो, असे विद्यार्थिनी अंकिता देसाई हिने सांगितले.असा होतो त्रासमान आणि पाठीच्या भागांमध्ये वेदनामानेची हालचाल करताना त्रास होतो.खांदा, हात, कोपरा, मनगटदुखी होते.हे करणे आवश्यकगॅझेटवर तासन्तास काम करण्याऐवजी ठरावीक वेळेनंतर विश्रांती घ्यावी.मान, मणक्यांच्या नसा मोकळ्या होणारा व्यायाम करावा.स्मार्टफोन वापरताना मान ताठ ठेवावी.गॅझेट डोळ्यांच्या समपातळीवर ठेवावे.पालकांनी दक्षता घेणे आवश्यकमोबाइलची स्क्रीन लहान असते. त्यामुळे यावर अभ्यास करताना सतत डोळे आणि मान घालावी लागल्याने स्रायूंवर ताण वाढतो. १५, ३० किंवा ४० अंशांत मान वाकते तेव्हा डोके दुखणे, मानेचा त्रास, पाठदुखी हे आजार मुलांना उद्भवू शकतात. त्यामुळे पालकांनी योग्य दक्षता घेणे आवश्यक असल्याचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राहुल बडे यांनी सांगितले.स्नायू मोकळे होणारे व्यायाम करास्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, आदींवर काम करणे, शिक्षण घेण्याच्या प्रमाणासह मान, पाठदुखीने त्रस्त असणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे या गॅझेट्सची स्क्रीन योग्य अंतरावर ठेवावी. ठरावीक वेळेनंतर मान, खांद्याची हालचाल करावी. डोळ्यांना त्रास होणार नाहीत, अशा ग्लास या गॅझेटला लावाव्यात. स्मार्टफोनसाठी स्टँडचा वापर करावा. मान, मणक्यांचे स्नायू मोकळे होणारे व्यायाम करावे. - डॉ. उमेश जैन, अस्थिरोगतज्ज्ञ