शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पीएम मोदी मला इंटरव्ह्यू देत नाहीत, रवीश कुमारांनी डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 12:34 IST

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही न्यूज चॅनल्सला मुलाखत दिली होती. त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर विविध कारणांमुळे बरीच चर्चेत होती.

ठळक मुद्दे जेव्हा ते माझ्या समोर असतील मी त्यांचं प्रवचन ऐकत बसणार नाहीसध्या परिस्थिती वेगळी आहे. 99% मीडियाने सध्या गुडघे टेकले आहेत. त्यामुळे जेव्हा एखादाच कोणी प्रश्न विचारतो तर त्याला मोदीविरोधी म्हटलं जातं. मला वाटतं त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत

मुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही न्यूज चॅनल्सला मुलाखत दिली होती. त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर विविध कारणांमुळे बरीच चर्चेत होती. पंतप्रधान मोदी केवळ आपल्या आवडीचे चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखत देतात अशी चर्चा सोशल मीडियावर होती. मोदी एनडीटीव्हीच्या रवीश कुमार यांना इंटरव्ह्यू का नाही देत? मोदी रवीश कुमार यांच्या प्रश्नांना घाबरतात का ? यावर देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.दरम्यान, स्वतः रवीश कुमार यांनी याबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे.  पंतप्रधान मोदी तुम्हाला मुलाखत का देत नाहीत? असा प्रश्न हिंदी न्यूज चॅनल कशिश टीव्हीच्या एका कार्यक्रमात रवीश कुमार यांना विचारण्यात आला. उत्तर देताना रवीश कुमार म्हणाले, ''कदाचित पंतप्रधान मोदी माझ्या प्रश्नांना घाबरतात. जेव्हा ते माझ्या समोर असतील मी त्यांचं प्रवचन ऐकत बसणार नाही. भजी कुठे-कुठे विकली जातात? कुठे 200 रूपयांना भजी मिळतात? असं काहीही मी अजिबात ऐकून घेणार नाही. मी त्यांना प्रतिप्रश्न करणारच, त्यांना प्रश्न विचारणं म्हणजे त्यांचा अनादर करणं नव्हे''. ''मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची एकहाती सत्ता आहे, जर सरकार त्यांचं आहे तर प्रश्न देखील त्यांनाच विचारले जाणार. पण सध्या परिस्थिती वेगळी आहे. 99% मीडियाने सध्या गुडघे टेकले आहेत. त्यामुळे जेव्हा एखादाच कोणी प्रश्न विचारतो तर त्याला मोदीविरोधी म्हटलं जातं. पण मी त्यांना विचारतोय की मोदीजी तुम्ही रवीश विरोधी का आहात ? दोन वर्षांपासून तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना माझ्या कार्यक्रमात पाठवणं बंद केलं आहे. मग नक्की विरोध कोण करतंय? मी विरोध करतोय की भाजपा माझा विरोध करतंय? भाजपाला विचारायला हवं की ते माझा तिरस्कार करतात की खरंच माझ्या प्रश्नांना घाबरतात. मला वाटतं त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. 2014 पर्यंत तर मला फोन करून कार्यक्रमात बोलावलं जायचं, मग आता काय झालं ?रवीश कुमार हे अनेकदा सोशल मीडियावर भाजपाच्या समर्थकांकडून ट्रोल होत असतात, ट्रोल करणारे समर्थक त्यांना भाजपा आणि मोदीविरोधी म्हणतात. यापूर्वी एनडीटीव्ही चॅनलवर केंद्र सरकारने बंदी आणली होती तेव्हादेखील रवीश कुमार यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर संताप व्यक्त केला होता, तेव्हाही त्यांनी मोदींना इंटरव्ह्यूचं एकप्रकारे थेट आव्हान दिलं होतं.    

टॅग्स :Ravish Kumarरवीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधान