शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

'ही NDA vs INDIA ची लढाई; आमचा लढा विचारधारेविरोधात', राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:17 IST

बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

NDA vs INDIA Opposition Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुत विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांनी हजेरी लावली होती. या बैठकीत विरोधकांच्या ऐक्याला INDIA नाव देण्यावर एकमत झाले आहे. बैठकीनंतर सर्व नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आज देशाचा आवाज दाबला जातोय. हा लढा देशासाठी आहे, म्हणूनच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA) हे नाव निवडले आहे. ही लढाई भाजप आणि विरोधक यांच्यात नाही. ही लढाई NDA विरुद्ध भारत आहे. नरेंद्र मोदी आणि भारत यांच्यात ही लढाई आहे. त्यांची विचारधारा आणि भारत यांच्यातला हा संघर्ष आहे. 

विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती

आज भारतातील संस्थांवर हल्ले होत आहेत. आमचा लढा भाजपच्या विचारसरणीविरुद्ध आहे. आम्ही लवकरच एक कृती आराखडा तयार करू आणि एकत्र येऊन आमची विचारधारा आणि आम्ही देशात काय करणार आहोत, याबद्दल जनतेला माहिती देऊ.

केजरीवाल काय म्हणाले?दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, गेल्या 9 वर्षात पीएम मोदी खूप काही करू शकले असते पण त्यांनी सर्व क्षेत्र उद्ध्वस्त केले. आज 26 पक्ष स्वत:साठी एकत्र आलेले नाहीत, तर देशासाठी आले आहेत. एकीकडे देशाला द्वेषापासून वाचवायचे आहे तर दुसरीकडे नव्या भारताचे स्वप्न घेऊन आपण सगळे एकत्र आलो आहोत. तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, NDA, तुम्ही I.N.D.I.A. ला आव्हान देऊ शकता का?, असा प्रश्न भाजपला विचाचरला. 

आघाडीचा प्रमुख मुंबईतील बैठकीत ठरणारभाजपविरोधातील आघाडीला INDIA (Indian National Developmental Inclusive Alliance) नाव देण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खर्गे यांनी या आघाडीच्या नावाची औपचारिक घोषणा केली. यावेळी त्यांनी आजची बैठक यशस्वी झाल्याचे सांगून पुढील बैठक मुंबईत होणार असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत सचिवालय स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगितले. याशिवाय, 11 जणांची समितीही स्थापन होणार आहे. या समितीत कोण असेल, हे लवकरच ठरवले जाईल. ही समिती INDIA आघाडीचा प्रमुख ठरवणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक