बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर IANS-MATRIZE च्या आलेल्या नव्या ओपिनियन पोलने पुन्हा एकदा एनडीए सरकारचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वेक्षणानुसार एनडीएला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. तर जेडीयूलाही मोठ्या प्रमाणावर जागा मिळण्याचा अंदाज आहे.
या सर्व्हेच्या आकडेवारीनुसार भाजपला 83 ते 87 एवढ्या जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचबरोबर नीतीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड)ला 61 ते 65 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा पद्धतीने एनडीएला एकूण 153 ते 164 एवढ्या जागा मिळू शकतात. तर मतांचा टक्का जवळपास 49 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
काँग्रेसला किती जागा? -दुसरीकडे महागठबंधनाला मोठा झटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 62 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर संपूर्ण आघाडीला केवळ 76 ते 87 जागाच मिळण्याची शक्यता आहे. यांपैकी काँग्रेसला तर केवळ 7 ते 9 जागा आणि सीपीआय-एमएलला 6 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवया मुकेश सहनी यांच्या व्हीआयपी पक्षाला 1 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
आरजेडीला 22 टक्के, तर भाजपला 21 टक्के मते -विश्लेषकांच्या मते, हा अंदाज खरा ठरला तर, ती मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या 20 वर्षांच्या कामावरही मोहर असेल. मतांच्या टक्केवारीत आरजेडीला 22 टक्के, तर भाजपला 21 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, भाजपला जागांच्या बाबतीत आघाडीवर राहील. कारण जेडीयू आणि लोजपासारख्या सहकारी पक्षांच्या मतांचा फायदा भाजपला मिळला आहे.
Web Summary : Bihar opinion poll forecasts NDA victory with BJP leading. JDU also gains seats. Congress suffers losses. RJD gets 22% votes, BJP 21%, but BJP leads in seats due to alliance.
Web Summary : बिहार चुनाव में एनडीए की जीत का अनुमान, बीजेपी सबसे आगे। जेडीयू को भी सीटें मिलेंगी। कांग्रेस को नुकसान। आरजेडी को 22% और बीजेपी को 21% वोट, लेकिन बीजेपी गठबंधन के कारण आगे।