शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री जमीन पर! मोदी सरकारच्या मंत्र्यांच्या विमान प्रवास खर्चात मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 11:29 IST

गेल्या 4 वर्षांमध्ये मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट

नवी दिल्ली: गेल्या साडेचार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर सातत्यानं टीका झाली. मोदी देशात कमी अन् परदेशात जास्त असतात, असं टीकास्त्र विरोधकांनी वारंवार सोडलं. मात्र मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या विमान प्रवास खर्चात गेल्या चार वर्षांमध्ये सातत्यानं घट होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही संपूर्ण आकडेवारी प्राप्त झाली आहे. मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर नेमका किती खर्च झाला, असा प्रश्न माहिती अधिकारातून विचारण्यात आला. या अर्जाला कॅबिनेटच्या जमाखर्च विभागानं उत्तर दिलं आहे. 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2018 या कालावधीत कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांचा विमान खर्च 225.30 कोटी रुपये झाल्याची माहिती यातून समोर आली. तर राज्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर आलेला खर्च 13.75 कोटी रुपये इतका आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या 25 कॅबिनेट, 45 राज्यमंत्री आहेत. यातील 11 जणांकडे स्वतंत्र प्रभार आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांमध्ये मोदी सरकारच्या मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांच्या विमान खर्चात सातत्यानं घट झाली आहे. 2014-2015 या कालावधीत यावर 90.88 कोटींचा खर्च झाला. मात्र यामध्ये यूपीएच्या मंत्र्यांच्या खर्चाचादेखील समावेश आहे. यूपीए आणि एनडीए मंत्र्यांच्या प्रवासावरील खर्चाची वर्गवारी आरटीआयमधून देण्यात आलेली नाही. तर पंतप्रधानांच्या आतापर्यंतच्या परदेश दौऱ्यावरील विमान प्रवासाचा खर्च 2,021.58 कोटी रुपये आहे. 

मोदींच्या मंत्र्यांचा परदेश दौऱ्यावरील विमान प्रवासाचा खर्च2014-15    90.88 कोटी2015-16    80.51 कोटी2016-17    40.02 कोटी2017-18    27.64 कोटी 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाministerमंत्री