शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

बिहारमध्ये NDAतील तिढा सुटला: विनोद तावडेंनी जाहीर केलं जागावाटप; कोणाला किती जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 18:03 IST

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाची घोषणा केली आहे.

Bihar NDA Seat Sharing ( Marathi News ) : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही मित्रपक्षांची संख्या वाढल्याने एनडीएच्या जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. मात्र अखेर आज एनडीएतील हा तिढा सुटला असून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाची घोषणा केली आहे. बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत असून त्याखालोखाल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाला जागा मिळाल्या आहेत.

विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एनडीएच्या माध्यमातून भाजप १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार आहे, तर जेडीयूला १६ जागा, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला ५ जागा, हिंदुस्तान अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. 

"आम्ही पाच पक्ष बिहारमध्ये वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवणार असलो तरी ४० मतदारसंघांमध्ये आम्ही एनडीए म्हणून ताकदीने लढणार असून सर्व मतदारसंघांमध्ये विजय मिळवू," असा विश्वासही विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

 दरम्यान, देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीची साथ सोडत भाजपसोबत जाणं पसंत केलं. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीसोबतची युती तोडून नितीश कुमारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर ते भाजपसोबत एनडीएच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार, हे निश्चित होतं. मात्र त्यांच्यासोबत इतरही मित्रपक्ष असल्याने एनडीएच्या जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. आता अखेर हा तिढा सुटला असून जागावाटपाची घोषणा करण्यात आली आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४Biharबिहारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४