शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

एनडीएकडे अनेक छाेटे पक्ष, महाराष्ट्रातील ५; वाढवू शकतात मतांचा टक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 06:39 IST

२०२४मध्ये वाढवू शकतात आघाडीच्या मतांचा टक्का

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४मध्ये होणाऱ्या महासंग्राममध्ये २६ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीशी मुकाबला करण्यासाठी एनडीएने ३८ पक्षांची आघाडी करून शक्तिप्रदर्शन केले आहे. यात भाजपने बहुतांश लहान पक्षांना आपल्या बाजूने वळविले आहे. ते भलेही स्वत: जागा जिंकू शकतील किंवा न जिंकू शकतील, परंतु एनडीएच्या मताचा टक्का वाढवू शकतात.

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ला शह देण्यासाठी भाजपच्या नेतृत्वात एनडीएची बैठक झाली. अशी बैठक मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिली बैठक होती. या बैठकीला हजर असलेल्या पक्षांपैकी २४ घटक पक्षांचा लोकसभेत एकही सदस्य नाही. फार तर हे पक्ष प्रादेशिक स्तरावर एनडीएचा मताचा टक्का वाढवू शकतात.

सर्वांत मोठा पक्ष शिवसेनाएनडीएच्या भाजपशिवाय इतर घटक पक्षांमध्ये खासदारांच्या संख्येच्या बाबतीत शिवसेना शिंदे गट १२ खासदारांसह सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी पारस गट आहे.

काका-पुतण्याच्या वादात एनडीएबिहारमध्ये केंद्रीय मंत्री पशुपती पारस व चिराग पासवान हे लोकजनशक्ती पार्टीचे स्वतंत्र गट आहेत. काका-पुतण्यामधील वाद दूर करण्याची जबाबदारी स्वत: अमित शाह यांनी घेतली आहे. सोमवारी त्यांनी चिराग पासवान यांच्याशी याबाबत चर्चाही केली होती.

शिरोमणी अकाली दल, तेलगू देसम पार्टी व राष्ट्रीय लोकदल हे तिन्ही पक्ष एनडीएच्या बैठकीत सहभागी झाले नाहीत. यामागे जागावाटपाचे कारण सांगितले जात आहे. टीडीपी आंध्र प्रदेशबरोबरच तेलंगणामध्येही भाजपबरोबर युतीची चर्चा करीत होती. परंतु भाजप तेलंगणात स्वबळावर लढू इच्छित आहे.पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल भाजपला लोकसभेच्या केवळ चार जागा देऊ करीत आहे. मात्र, भाजप पंजाबमध्ये पाच ते सहा जागा मागत आहे.रालोदचे जयंत चौधरी यांनी पश्चिम उत्तर प्रदेशच्या जाटबहुल चार जागा मागितल्या आहेत. यात बागपत, मुजफ्फरनगर, कैरानाचा समावेश आहे. भाजपकडून या जागांबाबत आश्वासन न मिळाल्यामुळे चौधरी एनडीएपासून दूर राहिले.

एनडीए गटात कोण? 

भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी (पारस), लोक जनशक्ति पार्टी (रामविलास पासवान), अपना दल (सोनेलाल), एआयएडीएमके, एनपीपी, एनडीपीपी, एसकेएम, आयएमकेएमके, आजसू, एमएनएफ, एनपीएफ, आरपीआय, जेजेपी, आईपीएफटी (त्रिपुरा), बीपीपी, पीएमके, एमजीपी, एजीपी, निषाद पार्टी, यूपीपीएल, एआयआरएनसी, टीएमसी (तमिल मनीला काॅंग्रेस), शिरोमणि अकाली दल संयुक्त जनसेना, एनसीपी (अजित पवार), हम, रालोसपा, सुभासपा, बीडीजेएस (केरळ), केरळ काॅंग्रेस (थॉमस), गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट, जनातिपथ्य राष्ट्रीय सभा, यूडीपी, एचएसडीपी, जन सुराज्य पार्टी (विनय कोरे), प्रहार जनशक्ति पार्टी (बच्चू कडू)

महाराष्ट्रातील पाच पक्षएनडीएत महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाइं आठवले गट, जनसुराज्य पार्टी व प्रहार जनशक्ती पार्टी सहभागी आहे.

 

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस