शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 09:20 IST

केंद्रातील मोदी सरकारला लवकरच ७ वर्ष पूर्ण होणार; अध्यक्षांचं भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला आहे. या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण होणार असल्याच्या निमित्तानं कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करू नका. कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी कार्यक्रम नक्की हाती घ्या, अशा सूचना नड्डा यांनी दिल्या आहेत.काेराेनाच्या महामारीत भाजपचे वाईट राजकारण, नाना पटाेलेंचा टोला   'कोरोना संकटाच्या कठीण काळात जनतेचं दु:ख कमी करण्यासाठी, त्यांच्या आयुष्याचं रक्षण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून तुमच्या आणि तुमच्या राज्यातील सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. या जागतिक महामारीनं आपल्या देशासमोर अनेक आव्हानं निर्माण केली आहेत. या संकटांचा सामना सध्या आपला देश करत आहे,' असं नड्डा यांनी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.देवेेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे पॅकेजसाठी आग्रह धरावा, नवाब मलिक यांचा सल्ला'गेल्या शतकभरात जगानं असं भयंकर संकट पाहिलेलं नाही. भारतच नव्हे, तर संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. शंभर वर्षांनंतर आलेल्या या भीषण संकटानं आपल्या अनेक जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून कायमचं दूर नेलं. आपल्या देशाला आणि समाजाला या संकटामुळे अनेक घाव झेलावे लागले. त्याच्या जखमा अद्याप कायम आहेत,' असं नड्डा यांनी पत्रात नमूद केलं आहे.'कोरोना संकटामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कित्येकांनी त्यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींना गमावलं. काही मुलांचे आई वडील कोरोनानं हिरावून नेले. अशा मुलांवर दु:खाचा किती मोठा डोंगर कोसळला आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. या मुलांच्या भविष्याची चिंता करणं आणि त्यासाठी ठोस पावलं उचलणं ही आपली जबाबदारी आहे. या मुलांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना सांभाळणं हे आपलं सामाजिक कर्तव्यदेखील आहे. अशा मुलांसाठी आणि कुटुंबीयांसाठी असलेल्या योजनांची माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल,' अशा शब्दांत नड्डा यांनी आई वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीj. p. naddaजे. पी. नड्डा