शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या काळात युपीए सरकारपेक्षा 73 टक्के जास्त महामार्गांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 12:08 IST

रालोआ सरकारने रस्तेबांधणी क्षेत्राला विशेष महत्त्व दिल्याचे गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे

नवी दिल्ली- गेल्या चार वर्षांमध्ये युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा 71 टक्के अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील रालोआ सरकारने रस्ते बांधणीच्या क्षेत्रात केलेल्या वेगवान प्रगतीचे कौतुक केले जात आहे. या सरकारने पहिल्या चार वर्षांमध्येच 28,531 किमी राष्ट्रीय महामार्गांची बांधणी केली आहे तर संपुआ सरकारच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये 16,505 किमी इतक्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते.रालोआ सरकारने रस्तेबांधणी क्षेत्राला विशेष महत्त्व दिल्याचे गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. 2017-18 या वर्षी राष्ट्रीय महामार्गांची सर्वात जास्त निर्मिती झाली. या वर्षभरात 9 हजार 829 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले तर 2016-17 या वर्षभरात 8 हजार 231 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले.

2015-16 या वर्षी 6 हजार 61 किमी लांबीचे तर 2014-15 या वर्षी 4 हजार 410 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते. 2010-11 या वर्षी 4,500 किमीचे तर 2011-12 या वर्षभरात केवळ 2,013 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले. 2012-13 या वर्षी 5,732किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले होते.संपुआ सरकारच्या 2010-11 ते 2014 ते 15 या काळात प्रतीदिन सरासरी 11.27 किमी या वेगाने रस्त्यांची निर्मिती झाली होती. मात्र सध्याच्या सरकारने या चार वर्षांमध्ये प्रतीदिन 19.5 किमी रस्त्यांची बांधणी केली आहे. 2014-15 या साली नव्या सरकारने 11.67 किमी प्रतिदिन वरुन रस्तेबांधणीची सरासरी 12 किमी वर नेली. 2015-16 मध्ये ती 22.5 झाली तर 2016-17मध्ये 22.5 आणि 2016-17मध्ये त्याच्याहीपुढे जात प्रतीदिन 26.9 किमीचा वेग गाठण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठवहनमंत्री नितिन गडकरी यांनी प्रतीदिन 45 किमी वेगाने रस्ते बांधण्याचे ध्येय ठेवले आहे. 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गhighwayमहामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Nitin Gadkariनितीन गडकरी