शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे, भाजपाला दिल्या एवढ्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:48 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा कानोसा घेण्यासाठी काँग्रेसकडूनही अंतर्गत एक्झिट पोल घेण्यात आले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तसंस्थांनी आपापली एक्झिट पोल जाहीर केली होती. या एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमतापर्यंत पोहोचेल असा सर्वसाधारण अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा कानोसा घेण्यासाठी काँग्रेसकडूनही एक्झिट पोल घेण्यात आले असून, या एक्झिट पोलमध्येही एनडीएला यूपीएपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र भाजपाला दोनशेहून कमी जागा मिळतील आणि एनडीएला केवळ 230 पर्यंत जागा मिळतील असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तर काँग्रेस स्वबळावर 140 जागा जिंकेल आणि यूपीएला 195 जागा मिळतील, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.  काँग्रेसने घेतलेल्या अंतर्गत एक्झिट पोलनुसार यूपीएला तामिळनाडू, केरळ आणि पंजाबमध्ये चांगले यश मिळेल. तसेच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्येही पक्षाची कामगिरी चांगली होणार आहे. यूपीएला बिहारमध्ये 15, महाराष्ट्रात 22 ते 24, तामिळनाडूत 34 केरळमध्ये 15, कर्नाटकात 11 ते 13 आणि मध्य प्रदेशात 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय  गुजरातमध्ये 7, हरियाणात 5 ते 6,  छत्तीसगडमध्ये 9 आणि पूर्वोत्त राज्यांत 9 ते 10 जागा मिळण्याची अपेक्षा काँग्रेसमध्ये आहे. सर्व एक्झिट पोल काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ 2 जागा देत असले तरी या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात 5 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण भारतात काँग्रेस आणि एनडीएला चांगले यश मिळेल,अशी अपेक्षा या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहे. विविध निवडणूक क्षेत्रांमध्ये उपस्थित असलेले 260 पर्यवेक्षक, राज्यांचे प्रभारी आणि स्थानिक नेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काँग्रेसने ही आकडेवारी मिळवली आहे.  काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही एनडीएच सर्वात मोठी आघाडी ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी एनडीएला 230 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला असून एनडीएला बहुमतासाठी 40 जागा कमी पडतील, असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच भाजपालाही 200 पेक्षा कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा