८९ व्या वर्षी एन.डी. तिवारींचे शुभमंगल

By Admin | Updated: May 15, 2014 13:04 IST2014-05-15T13:03:33+5:302014-05-15T13:04:26+5:30

काँग्रेसचे नेते नारायण दत्त तिवारी हे वयाच्या ८९ व्या वर्षी विवाहबद्ध झाले आहेत बुधवारी तिवारींनी उज्ज्वला शर्मा यांच्याशी विवाह केला.

N.D. at the 9th year Shubhamangal of Tiwari | ८९ व्या वर्षी एन.डी. तिवारींचे शुभमंगल

८९ व्या वर्षी एन.डी. तिवारींचे शुभमंगल

>ऑनलाइन टीम
लखनौ, दि. १५ - काँग्रेसचे नेते नारायण दत्त तिवारी हे वयाच्या ८९ व्या वर्षी विवाहबद्ध झाले आहेत. बुधवारी तिवारींनी उज्ज्वला शर्मा यांच्याशी विवाह केला. उज्ज्वला शर्मा या एन.डी. तिवारींचे पुत्र रोहित शेखर यांच्या आई आहेत. 
काँग्रेस नेते एन.डी. तिवारी यांनी मार्चमध्ये रोहित शेखर यांना पूत्र म्हणून स्वीकारले होते. सुरुवातीला तिवारींनी रोहितला पूत्र म्हणून स्वीकारले नव्हते. मात्र रोहितने याप्रकरणी थेट न्यायालयात धाव घेतल्याने एन.डी. तिवारींचे पितळ उघडे पडले. डीएनए तपासणीत रोहित तिवारींचे पूत्र असल्याचे स्पष्ट झाले. अखेरीस मार्चमध्ये तिवारींनी रोहितला पूत्र म्हणून स्वीकारले. यानंतर आता तिवारींनी रोहितची आई उज्ज्वला शर्मा यांनादेखील स्वीकारले आहे. बुधवारी या दोघांनी लखनौमध्ये लग्न केले. मात्र या विवाह सोहळ्याला रोहित धवन गैरहजर होते. 

Web Title: N.D. at the 9th year Shubhamangal of Tiwari