गोपाळ शेींच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीची निदर्शने
By Admin | Updated: February 20, 2016 00:07 IST2016-02-20T00:07:05+5:302016-02-20T00:07:05+5:30
मुंबई: शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार गोपाळ शेी यांच्या बोरीवली येथील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी शेी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

गोपाळ शेींच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीची निदर्शने
म ंबई: शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार गोपाळ शेी यांच्या बोरीवली येथील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी शेी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शेतकरी आत्महत्यांची गंभीर समस्या राज्यासमोर असताना एकीकडे राज्य सरकार विविध सोहळ्यांच्या आयोजनात व्यस्त आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपा नेते बेताल वक्तव्ये करुन शेतक-यांच्या अगतिकतेची था करत आहेत. शेतकर्याच्या आत्महत्येला फॅशन ठरविणार्या शेी यांच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. शेी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणीही पक्षाच्यावतीने करण्यात आली. .................आत्महत्येला फॅशन म्हणणे हा आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार आहे. शिवाय शेी यांच्या विधानामुळे राष्ट्रीय एकात्मतेस बाधा पोहचली आहे. त्यामुळेउत्तर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष इंद्रपाल सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तसे निवेदन कांदिवली पोलिसांना दिले. राज्याच्या ग्रामीण भागातील जनता दुष्काळाने त्रस्त असून माणसे आणि जनावरांचा जीव पाण्याअभावी मेटाकुटीला आला आहे. त्यांना मदत करायचे सोडून सरकार मेक इन इंडियावर मात्र कोट्यवधीची उधळण करत आहे. राज्यात दर महिन्याला सरकारी सोहळे आणि इव्हेेंट होत आहेत. त्यामुळे हे सरकार आहे की इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, असा प्रश्न अहिर यांनी केला आहे.