शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष, राहुल विरोधी पक्षनेते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 10:27 IST

लोकसभेत राहुल गांधी व बाहेर पक्षाध्यक्ष शरद पवार याप्रकारे काँग्रेस अधिक मजबुतीने काम करेल, असे दोन्ही पक्षांना वाटत आहे

शीलेश शर्मा नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाही म्हणत असले, तरी काँग्रेसमध्ये तो पक्ष विलीन होण्याची शक्यता आहे. उच्चपदस्थांच्या माहितीनुसार दोन्ही पक्षांत चर्चा सुरू आहे. मात्र, विलीनीकरणानंतर राज्य नेतृत्वाबाबत काय करायचे, हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, विलीनीकरण होणार, हे जवळपास नक्की आहे. मात्र, त्यासाठी किती कालावधी लागेल, हे आताच सांगणे शक्य नाही. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, राहुल गांधीशरद पवार यांच्या गुरुवारच्या भेटीत याबाबत चर्चा झाली नाही, कारण दोघांत हा विषय आधीच चर्चिला गेला  आहे. या दोघा नेत्यांच्या विचारांत कमालीचे साधर्म्य असून, लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता, दोन्ही पक्षांना विलिनीकरणाबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

राहुल गांधी पक्षाध्यक्षपद सोडण्याबाबत अतिशय आग्रही असून, त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर ते पद शरद पवार यांना मिळू शकेल, याची जोरात चर्चा सुरू आहे. मात्र राहुल गांधी अंतिम निर्णय घेईपर्यंत असे अंदाज बांधणे चुकीचे ठरेल, असे काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदाबाबत किमान एक महिना लागेल, असे सांगून हा नेता म्हणाला की, पद सोडल्यानंतरही ते पद कोणाला द्यायचे, याचा निर्णयही राहुल गांधी स्वत:च घेतील. तोपर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल.

काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे विलिनीकरण झाल्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्नही सुटू शकेल. काँग्रेसकडे ५२, तर राष्ट्रवादीकडे ५ खासदार आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी ५४ खासदारांचीच गरज आहे. कदाचित पक्षाध्यक्षपद सोडल्यावर राहुल गांधीच विरोधी पक्षनेते होऊ शकतील.  लोकसभेत राहुल गांधी व बाहेर पक्षाध्यक्ष शरद पवार याप्रकारे काँग्रेस अधिक मजबुतीने काम करेल, असे दोन्ही पक्षांना वाटत आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवार