शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बाजारपेठेत अत्यंत महागड्या चांदीच्या नॅनो तारेवर‘एनसीएल’ची चमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 14:33 IST

सुक्ष्म तारेच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्या जगात केवळ ६-७ असून त्यातही तीनच कंपन्यांची मक्तेदारी

ठळक मुद्देसद्यस्थितीत या तारेची निर्मिती करणारे ९९ टक्क्यांहून अधिक उत्पादक भारताबाहेरील भारतामध्ये या तारेचा वापर करून उपकरणे बनविणाऱ्या कंपन्या नाहीतदररोज ५०० ग्रॅम उत्पादन क्षमता असली तरी मागणीअभावी हे उत्पादन होते कमी

पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी स्मार्टफोन, एलसीडी टीव्ही संचासारख्या उपकरणांमध्ये वापर होत असलेल्या चांदीच्या नॅनो (सुक्ष्म) तारेची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. जागतिक बाजारपेठेत अत्यंत महागडी असलेली ही तार तब्बल बारा पटीने स्वस्तात उफलब्ध होऊ शकणार आहे. या तारेची उत्पादन सुरू करण्यात आले आहे.वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांच्या हस्ते या तारेची प्रायोगित तत्वावर निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. हा प्रकल्प ‘एनसीएल’मध्येच उभारण्यात आला आहे. संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्राची काटे, सुनेहा पाटील, डॉ. बी. एल. व्ही प्रसाद आणि डॉ. नंदिनी देवी यांचा हे तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाचा वाटा राहिला आहे. मागील चार वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. सद्यस्थितीत या तारेची निर्मिती करणारे ९९ टक्क्यांहून अधिक उत्पादक भारताबाहेरील आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये वापरण्यात येणारी बहुतेक सुक्ष्म साहित्य भारताला आयात करावे लागते. स्मार्ट फोन, एलसीडी टीव्ही, लॅपटॉप यामध्ये वापरण्यात येणारे टच स्क्रीनसाठीचे सर्कीट तसेच इतर जोडण्यांमध्येही या सुक्ष्म तारेचा वापर केला जातो. भारतामध्ये या उपकरणांची केवळ जोडणी केली जाते. मात्र, सर्व सुट्टे भाग परदेशातून भारतात येतात. सुक्ष्म तारेच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्या जगात केवळ ६-७ असून त्यातही तीनच कंपन्यांची मक्तेदारी आहे. त्यामुळे या तारेची किंमत खुप अधिक आहे. जागतिक बाजारपेठेत ही तारेसाठी प्रति ग्रॅम ३० हजार रुपये मोजावे लागतात. ‘एनसीएल’मध्ये तयार होत असलेल्या तारेचा उत्पादन खर्च केवळ २ हजार रुपये एवढाच आहे. भारतामध्ये या तारेचा वापर करून उपकरणे बनविणाऱ्या कंपन्या नाहीत. त्यामुळे ‘एनसीएल’मध्ये सध्या अत्यंत मर्यादीत स्वरूपात उत्पादन केले जात आहे. दररोज ५०० ग्रॅम उत्पादन क्षमता असली तरी मागणीअभावी हे उत्पादन कमी होते. या तारेची निर्यात करण्यासाठी काही कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपसह अन्य इलेक्टॉनिक तसेच तारेचा उपयोग होणाºया क्षेत्रातील कंपन्यांना पुरवठा केला जाईल, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.------------ऱ्या 

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञानTelevisionटेलिव्हिजनMobileमोबाइल