बॉलिवूड-टॉलिवूडचे ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध, निर्मात्याला अटक; उदयनिधी स्टॅलिन यांचीही चौकशी होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 06:13 PM2024-03-09T18:13:25+5:302024-03-09T19:18:49+5:30

NCB Arrests Tamil Nadu-Based Drug Dealer Jaffer Sadiq : जफर सादिक या तमिळ चित्रपट निर्मात्याला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याच्या आरोपाखाली एनसीबीने अटक केली आहे.

NCB Arrests Tamil Nadu-Based Drug Dealer and ex-DMK Functionary in International Trafficking Case, NCB May Call Udhayanidhi Stalin May For Probe | बॉलिवूड-टॉलिवूडचे ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध, निर्मात्याला अटक; उदयनिधी स्टॅलिन यांचीही चौकशी होऊ शकते

बॉलिवूड-टॉलिवूडचे ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध, निर्मात्याला अटक; उदयनिधी स्टॅलिन यांचीही चौकशी होऊ शकते

NCB Arrests Tamil Nadu-Based Drug Dealer Jaffer Sadiq (Marathi News) : नवी दिल्ली : टॉलिवूड आणि बॉलिवूड पुन्हा एकदा ड्रग्ज सिंडिकेटशी जोडले गेले आहेत. जफर सादिक या तमिळ चित्रपट निर्मात्याला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याच्या आरोपाखाली एनसीबीने अटक केली आहे. स्पेशल सेलच्या मदतीने सादिकला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. चौकशीत सादिकचे संबंध भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या ड्रग्ज कार्टेलसोबत असल्याचे समोर आले आहे. 

या ड्रग्ज व्यवसायातून मिळालेला पैसा सादिक फिल्म मेकिंग, रिअल इस्टेट, हॉटेल्स आणि इतर व्यवसायात गुंतवत होता. गेल्या आठवड्यात या सिंडिकेटशी संबंधित तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत जफर सादिकची माहिती मिळाली. दरम्यान, या प्रकरणात एनसीबी तामिळनाडूमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचीही चौकशी करू शकते.

एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, जफर सादिकने चौकशीदरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांना 7 लाख रुपये दिल्याची कबुली दिली आहे. ही रक्कम कोणत्या कारणासाठी देण्यात आली याचा तपास सुरू आहे. ड्रग्ज मनी उदयनिधी स्टॅलिन यांना देण्यात आली होती का, याचाही तपास केला जात आहे. मनी लाँड्रिंगचा तपास करण्यासाठी एनसीबी आता ईडीला पत्र लिहित आहे. 

एनसीबी लवकरच काही बॉलीवूड फिल्म फायनान्सर्सना समन्स पाठवेल आणि त्यांना चौकशीसाठी बोलावेल. दरम्यान, मंगाई हा चित्रपट पूर्णपणे ड्रग्जच्या पैशातून बनवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांना दिलेल्या 7 लाख रुपयांपैकी 2 लाख रुपये पक्ष निधीसाठी आणि पूर निधीसाठी 5 लाख रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

एनसीबीच्या रडारवर आल्यानंतर जफर सादिक हा 15 फेब्रुवारीपासून फरार होता. फरार असताना तो त्रिवेंद्रम-मुंबई-पुणे-हैदराबाद-जयपूर येथे राहत होता. एनसीबीने त्याच्याकडून 50 किलो स्यूडोफेड्रिन ड्रग्ज  जप्त केले. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, जफर सादिकने आतापर्यंत 3500 हजार किलो ड्रग्ज परदेशात पाठवले आहे, म्हणजेच त्याने जवळपास 4 हजार कोटी रुपयांचा पुरवठा केला आहे. चेन्नईतही त्याचे हॉटेल आहे. 2019 मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणात त्याचे नाव मुंबई कस्टम्ससमोर आले होते.

Web Title: NCB Arrests Tamil Nadu-Based Drug Dealer and ex-DMK Functionary in International Trafficking Case, NCB May Call Udhayanidhi Stalin May For Probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.