नक्षल्यांनी केली तरुणाची हत्या

By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:25+5:302015-02-08T00:19:25+5:30

नक्षल्यांनी केली तरुणाची हत्या

Naxalites killed the youth | नक्षल्यांनी केली तरुणाची हत्या

नक्षल्यांनी केली तरुणाची हत्या

्षल्यांनी केली तरुणाची हत्या
घोडेझरी येथील घटना : पोलीस खबर्‍या असल्याचा संशय
धानोरा (जि़ गडचिरोली) : तालुक्यातील गोडलवाही पोलीस मदत केंद्रांतर्गत घोडेझरी येथील एका तरुणाची नक्षल्यांनी गुरूवारी रात्री गळा चिरून हत्या केली. इंदरशहा केसू परसा (५०) असे या मृताचे नाव आहे.
गुरूवारी रात्री १५ ते २० सशस्त्र नक्षली घोडेझरी येथे गेले. त्यांनी इंदरशहाला झोपेतून उठवून गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. हे कृत्य चातगाव दलमच्या नक्षल्यांनी केल्याचा अंदाज आहे. गोडलवाही पोलीस मदत केंद्रापासून २० किमी अंतरावर ही घटना घडली. कोंदावाही मार्गावरील जिल्हा परिषद शाळेजवळ हत्या केल्यानंतर नक्षल्यांनी या ठिकाणी चिठ्ठी लिहून टाकली. तीत २००४ व २००७ मध्ये परसा याने पोलिसांना माहिती पुरविली होती, असा उल्लेख केला आहे. परसाला याआधी ताकीद देण्यात आली होती़ मात्र त्याने नक्षली संघटनेचे ऐकून न घेतल्याने त्याची हत्या करण्यात आली असेही या चिठ्ठीत नमूद आहे.
अलिकडच्या काळात नक्षली कारवाया वाढल्या आहेत. १५ दिवसांपूर्वी याच परिसरातील पुस्टोला-गरंजी मार्गावर नक्षल्यांनी एका बांधकाम कंपनीच्या मालकीची १५ वाहने जाळली होती. आता नक्षल्यांनी पोलीस खबर्‍या असल्याच्या संशयावरून नागरिकांची हत्या करणे सुरू केल्याने या भागात दहशत पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Naxalites killed the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.